आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Maharashtra University,latest News In Divya Marathi

संमोहित करून अत्याचार केल्याचा संशय; विद्यापीठात विनयभंग दोघा आरोपींना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक भवनात गैरमार्गाने रूम मिळवून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना ऑक्टोबर रोजी रात्री घडली. हा प्रकार गुरुवारी (दि. 9)उघडकीस आला. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. अलाअब्देल रहीम मोहंमद (वय 32, मूळ राहणार दुबई, ह.मु.औरंगाबाद) आणि परवीन वेसी बरगोनी (वय 38, मूळ रा. इराण, ह.मु. उमवि वसतिगृह) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. परवीन विद्यापीठात तत्वज्ञान विषयात पीएच.डी करीत आहे.
उ.म.वि.त एमएस्सी करणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुलै महिन्यात पीडित मुलीने विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला होता. त्यानंतर परवीन हिने पीडितेशी ओळख वाढवली तसेच आपला मित्र अलाअब्देल याच्याशीही ओळख करून दिली. अलाअब्देलने वेळोवेळी पीडितेला प्रेमाचे आमिष देणारे एसएमएस करून मैत्री वाढवली. ऑक्टोबर रोजी त्याने शिक्षक भवनात गैरमार्गाने खाली मिळवून मुक्काम केला पीडितेचा विनयभंग केला.
शिक्षक भवनाचा गैरवापर झाल्याचे उघड
शिक्षकभवन हे बाहेरून येणा-या शिक्षकांसाठी मुक्कामाची जागा आहे. तरीही अलाअब्देलने ऑक्टोबर रोजी एका शिक्षकाची मदत घेऊन दोन रूम घेतल्या होत्या. पीडित मुलगी झोपल्यावर परवीन त्याच्या खोलीत आली. त्यानंतर वाजता पीडित मुलगीही तिथे आली. त्यानंतर दोघांनी आपल्याला संमोहित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पहाटे परवीन निघून गेल्यावर पीडितेला जाग आली, तेव्हा अलाअब्देलने आपला विनयभंग केला, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.
परवीन रस्टिकेट
परवीनला विद्यापीठातून रस्टिकेट करण्यात आले आहे. तसेच शिक्षक भवनाचा गैरवापर करण्यात कोण-कोण दोषी आहेत? त्याची चौकशी सुरू आहे. दोषींवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल. प्रा.डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरू
पोलिसांची कुचराई
याप्रकारानंतर पीडितेने कुलगुरू डॉ. मेश्राम यांच्याकडे तक्रार केली होती. डॉ. मेश्राम यांनी तातडीने पाळधी पोलिसांना बोलवून अलाअब्देल याला त्यांच्या ताब्यात दिले होते. मात्र पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडले होते.