आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंगला जल्लोषात सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग महोत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली. महाेत्सवाचे अाकर्षण असलेल्या स्वप्निल जाेशी यांनी उद‌्घाटन कार्यक्रमात तरुणाईची मने जिंकली. पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

उद‌्घाटनप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, कुलसचिव डॉ.ए.एम.महाजन, एसएसबीटी महाविद्यालयाचे विश्वस्त रावसाहेब शेखावत, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अॅड. रवींद्र पाटील, आर.एच.गुप्ता, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सत्यजित साळवे आदी उपस्थित होते. युवारंगसाठी केलेला ध्वज यावेळी फडकवण्यात अाला.

मैत्रीची निवड करा
युवकांनामार्गदर्शन करताना स्वप्निल जाेशी म्हणाला, प्रेम आणि मैत्री यापैकी जर एक निवडण्याची वेळ आली तर मैत्री निवडा. चुका करताना भीती बाळगू नका. कारण चुका करणारे लहान होत नाहीत. तर चुका करून सुधारत नाही ते लहान होतात. छोट्या चुकांमधून मोठे शोध लागतात, असेही त्याने सांगितले. कुलगुरु डाॅ.मेश्राम यांनी युवारंगच्या माध्यमातून कला जोपासल्या जात असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...