आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 रूपयाचे नाणे दिले म्हणून एकास मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव- दहा रुपयांचे नाणे हे चलनातून रद्द झालेले नाही. त्यामुळे ते स्वीकारू शकतात, असे रिझर्व्ह बँकेकडून वारंवार जाहीर करण्यात येत अाहे. तरीसुद्धा बाजारात दरराेज दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेमुळे वाद सुरू अाहेत. रविवारी दुपारी १२.३० वाजता फळ गल्लीत चहाविक्रेत्याला ग्राहकाने दहा रुपयांचे नाणे दिले. त्याचा राग येऊन विक्रेत्याने ग्राहकाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात दुकानदाराविराेधात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे.
 
समता नगरातील बाळू आत्माराम महाजन (वय ३७) हे रविवारी दुपारी मुलासोबत शहरात खरेदीसाठी आले होते. यानंतर ते फळ गल्लीत प्रीतम चहा या दुकानावर चहा पावडर खरेदी करण्यासाठी गेले. त्यांनी ३८ रुपयांची चहा पावडर खरेदी केल्यानंतर दुकानदाराला दहा-दहाच्या तीन नोटा एक दहा रुपयांचे नाणे दिले. या वेळी दुकानमालकाने नाणे स्वीकारण्यास नकार देत बाळू महाजन यांच्याशी वाद घातला त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 
 
मारहाण झाल्यानंतर त्यांनी मुलाला घेऊन शहर पोलिस स्टेशन गाठत प्रीतम चहा पावडर दुकानमालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस ठाण्यात दुकानमालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या एका मोबाइल रिचार्ज करणाऱ्या दुकानदाराने एका ग्राहकाला दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नसून, ते बंद झाले, असे एका चिठ्ठीवर लिहून दिले होते. 
 
वाद वाढताहेत 
गेल्या दाेन महिन्यांपासून १० रुपयांचे नाणे चलनातून रद्द झाल्याची अफवा पसरली अाहे. त्यामुळे अनेक विक्रेते तसेच ग्राहकही १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास तयार हाेत नाहीत. त्यामुळे दाेघांमध्ये वाद हाेऊन अनेक वेळा हाणामारीच्याही घटना घडत अाहेत. दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने सुट्या पैशांचीही वानवा दिसून येत अाहे. रिझर्व्ह बँक तसेच स्टेट बँकेने दहा रुपयांचे नाणे हे स्वीकारू शकतात, असे जाहीर केलेले असतानाही अफवांमुळे अनेक जण नाणे स्वीकारत नाहीत. काही विक्रेत्यांनी तर दुकानाबाहेर १० रुपयांचे नाणे स्वीकारले जाणार नाही, असे फलक लावले अाहेत. तसेच काही चक्क चिठ्ठ्यांवर नाणे स्वीकारले जात नसल्याचे लिहून देत आहेत. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...