आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Educational Qualifications Will Be Employment Opportunities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक पात्रता नसतानाही मिळणार रोजगाराच्या संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव कौशल्यविकास, रोजगार उद्योजकता विभागातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ५३१ युवकांची विविध कंपन्यांमध्ये रोजगारासाठी निवड झाली होती. मात्र, यापैकी केवळ ५० टक्के उमेदवारांनी नोकरीचा स्वीकार केला तर उर्वरित ५० टक्के युवकांनी ही नाेकरीची संधी नाकारली आहे.
कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागातर्फे वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्ह्याभरात पाच रोजगार मेळावे घेण्यात आले. या रोजगार मेळाव्यांमध्ये हजार २३४ नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता. तर टाटा मोटर्स, पॅजो, जीफोरएस, धूत ट्रान्समिशन, नवभारत फर्टिलायझर्स, सातपुडा ऑटोमोबाइल मेरिको या कंपन्याही मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी ७५० रिक्त पदांसाठी युवकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यापैकी ५३१ उमेदवारांची या मेळाव्यात प्राथमिक निवड करण्यात आली होती. यापैकी केवळ २६४ उमेदवारांनी या नोकरीचा स्वीकार करून कामाला सुरुवात केली, तर २६६ उमेदवारांनी नोकरीची संधी नाकारली आहे.

प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान
जळगावप्रमोदमहाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत शैक्षणिक पात्रता नसलेल्या परंतु, उत्तम व्यावसायिक कौशल्य असलेल्या उमेदवारांनाही आता रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्य वर्धन पुनर्काैशल्य विकासाच्या माध्यमातून १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना रोजगारक्षम करून त्यापैकी ७५ टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी किंवा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येणार आहेत. या दृष्टिकोनातून जिल्ह्यात नोंदणीला सुरुवात झाली असल्याची माहिती, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी के. डी. नाईक यांनी दिली.
बाजारपेठेतीलमागणीनुसार मिळेल उमेदवारांना प्रशिक्षण
उमेदवारांचीनोंदणी, मूल्यमापन चाचपणी आणि व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशनाच्या माध्यमातून मूल्यांकन करणे, त्या माध्यमातून सुयोग्य माहिती संकलित करणे. त्या आधारे बाजारपेठेतील मागणीनुसार नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून बायोमॅट्रिक पद्धतीने उमेदवारांची उपस्थिती नोंदवून उद्योगाच्या बाजारपेठेतील मागणीनुसार कौशल्य अाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

अभियानांतर्गत२५५ उमेदवारांची नोंदणी
याअभियानांतर्गत जिल्ह्यातील २२५ उमेदवारांनी, ४० उद्योजकांनी २६ ट्रेनर्सनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांना ट्रेनर्स प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच हे उमेदवार स्वयंरोजगारही करू शकतील.

बाजारानुरूप अभ्यासक्रम
कौशल्यविकासासाठी बाजारानुरूप अभ्यासक्रम तयार करून त्यांचे प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी पुरवठ्याबाबत नियमित सर्वेक्षण संशोधन करून रोजगार बाजार माहिती प्रणालीच्या आधारे मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी तसेच लोक सहभाग मिळवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीमही राबवण्यात येणार आहे.

१० कंपन्यात संधी
रोजगारमेळाव्याच्या माध्यमातून दहावी, बारावी आणि आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेल्या ५३१ युवकांना १० कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाली होती. त्यांना आठ ते दहा हजार रुपये पगार एकवेळ जेवणाची व्यवस्था कंपन्यांमार्फत करण्याचे कंपन्यांनी आश्वासन दिले होते. काही कंपन्यांनी राहण्याचीही व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे आगामी काळात त्यांना प्रशिक्षण वेतनवाढही मिळणार होती. मात्र, ५० टक्के युवकांनी नोकरीची संधी नाकारली आहे. के.डी. नाईक, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी