आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहम जोशी प्रकरणाचा पोलिस तपास थंडावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोहम जोशी यास केलेल्या मारहाण प्रकरणाचा पोलिस तपास थंडावला आहे, असा अाराेप करुन तपासास गती मिळावी, तसेच विशेष तपास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा महिला असोसिएशन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार अाहेत, अशी माहिती जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा वासंती दिघे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोहम जोशी प्रकरणात खंडणीचे कलम लावले आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य खऱ्या अर्थाने समोर आले आहे. परंतु आजही दाेन आरोपी फरार आहेत. पोलिस खात्याने एफआयआर घेण्यासाठी केलेली टाळाटाळ आणि स्नेहा जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली तत्परता, यामुळे समाजात निर्धन आणि दुर्बल अशा व्यक्तींकरिता पोलिस खात्याकडे कोणतीही संवेदनशीलता राहिली नसल्याचे दिसून येते. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे सामान्य माणसाच्या मनात सुरक्षितता राहिली नाही.

पालखी हे छळाचे ठिकाण : सोहमकडे एक बिघडलेला मुलगा असे गृहीत धरून या केसकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्याच्यावरील अन्याय, अत्याचाराची दखल घेणे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे याची निकड पोलिस कारवाईत जाणवत नाही. एखाद्या किशोरवयीन मुलाला बियर पार्टी, हुक्का पार्लर अशा अमली पदार्थांची सवय लावणे हा सामाजिक गुन्हा आहे. अशा प्रकारची प्रलोभने उपलब्ध करून देणारी व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये आहे, त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी. हॉटेल पालखी इंटरनॅशनल हे छळाचे ठिकाण आहे. त्या जागेशी संबंधित सर्व घटकांची खोलवर चौकशीची मागणीही करण्यात आली.

लढा सुरूच राहणार : सोहमच्यावाढदिवस पार्टीची व्हिडिओ क्लिप आरोपींनी अनेकांना दाखवली, पण पुरावे गोळा करण्यात पोलिस खात्याला हे फुटेज मिळत नाही. हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे. याबाबत चौकशी व्हावी, तसेच आम्ही कुठल्याही धमकीला घाबरणार नाही, असे दिघे यांनी सांिगतले. या वेळी उषा सरोदे, सचिन नारळे, रेखा कुलकर्णी, जगदीश नेवे, आत्माराम चौधरी, नितीन कुलकर्णी उपस्थित होते.

जामिनावर सोमवारी सुनावणी
साेहमप्रकरणातील गणेश धामणे, योगेश चौधरी गणेश जगताप यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश एसएमक्यू एस शेख यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. सरकारी वकील संभाजी जाधव यांनी युक्तिवाद केला. यावर २२ जून रोजी निर्णय घेण्यात येणार अाहे. आरोपींपैकी आरोपी अद्याप फरार असल्याने तिघांचा जामीन लांबण्याची स्थिती निर्माण झाली.
बातम्या आणखी आहेत...