आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृत’ला ६६ दिवसांनंतरही ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराच्या विकासासाठी संजीवनी ठरणाऱ्या अमृत योजनेच्या प्रारंभापासूनच अनंत अडचणींचा सामना करण्याची वेळ पालिका प्रशासनावर अाली अाहे. ६६ दिवसांनंतरही निविदा प्रक्रियेला प्रतिसाद नसल्याने अाता थेट शासनाचे मार्गदर्शन घेण्याची वेळ पालिकेवर अाली अाहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्र लिहून निविदा का येत नाही? याचा शाेध घेण्याची गरज व्यक्त करण्यात अाली अाहे.

अमृत याेजनेंतर्गत अडीचशे काेटीच्या कामांना जळगाव शहरात मान्यता मिळाली अाहे. शहरातील संपूर्ण जलवितरण व्यवस्था बदलण्याचे काम यातून करण्यात येणार अाहे. बांधकाम इतर कामे वेगवेगळ्या माध्यमातून करण्यासाठी सुरुवातीला राज्य शासनानेच निविदा रद्द केली हाेती. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली हाेती. परंतु त्यातही केवळ दाेेन निविदा दाखल झाल्या हाेेत्या. त्याला तीनवेळा मुदतवाढ देऊनही उपयोग हाेऊ शकला नसून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊन ठेपली अाहे. त्यामुळे कामाला उशिराने सुरुवात हाेऊन त्याचा इतर कामांवर देखील विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता अाहे.
असा हाेता कालावधी
दाेेन महिन्यांपूर्वी महापालिकेने अमृत योजनेसाठी निविदा प्रसिद्ध केली हाेती. परंतु शासनाने कामांची विभागणी केल्यामुळे निविदा रद्द करण्यात अाली हाेती. त्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही निविदेला प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा सात दिवसांच्या अंतराने तीन वेळा मुदतवाढ दिली हाेती. असा ६६ दिवसांचा कालावधी निविदा प्रक्रियेत गेला अाहे.
प्राधिकरणाला दिले पत्र
अमृतयोजनेसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला बुधवारी महापालिकेच्या शहर अभियंता दिलीप थाेरात यांनी पत्र दिले अाहे. ६६ दिवस हाेऊनही अमृत याेजनेंतर्गत करायच्या कामांसाठी एजन्सीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या कारणांचा शाेध घेण्याचे आवाहन केले अाहे. तसेच अाता पुन्हा मुदतवाढ देता येणार नसल्याने नव्याने प्रक्रिया राबवावी लागेल, असेही कळवले अाहे. जीवन प्राधिकरणाने यासंदर्भात शासनाकडूनच मार्गदर्शन घ्यावे, असे अावाहन केले अाहे. अाता १५ दिवसांच्या मुदतीची निविदा प्रसिद्ध केली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...