आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा : अहवाल गुप्त ठेवण्याचे शासन अादेश नव्हतेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जळगाव नगरपालिकेच्या घरकुल याेजनेच्या विशेष लेखापरीक्षणाचे अादेश शासनाने दिले हाेते. त्यांच्या अादेशानुसार करण्यात अालेल्या लेखापरीक्षणाचा अहवाल गुप्त ठेवावा असा काेणताही अादेश शासनाने दिलेला नव्हता, अशी माहिती स्थानिक लेखा विभागाचे उपमुख्य लेखा परीक्षक सतीश कडकसे यांनी उलटतपासणीत दिली. यामध्ये उत्तरे देताना साक्षीदारांचा गाेंधळ उडाला हाेता.

जळगाव घरकुल याेजनेचे विशेष लेखापरीक्षण करणाऱ्या नाशिक येथील स्थानिक लेखा विभागाचे उपमुख्य लेखापरीक्षक सतीश कडकसे यांची सरतपासणी झाली. बुधवारी अाराेपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. त्यात तत्कालीन मुख्याधिकारी पी. डी. काळे यांच्यातर्फे अॅड. प्रमाेद पाटील यांनी श्री. कडकसे यांना विचारले की, स्पेशल अाॅडिट करण्याच्या वेळी अापण जळगाव महापालिकेत भेट दिलीच नव्हती, असे म्हणणे खाेटे असल्याचे सांगितले. तसेच अापण एकट्याने नव्हे तर सांघिकपणे हे लेखापरीक्षण केले. टीमने केलेल्या लेखापरीक्षणाचे पुनर्लाेकन जिल्हा लेखापरीक्षक पाे. भा. धनगर यांनी केले. त्यानंतर ताे रिपाेर्ट अापल्याला प्राप्त झाला हे खरं अाहे. लेखापरीक्षण अहवालात लेखापरीक्षणाचा कालावधी अाणि त्यासाठी तपासण्यात अालेल्या कागदपत्रांची यादी अहवालात देणे गरजेचे असते. मात्र, यात कालावधी नमूद असला तरी पाहिलेल्या कागदपत्रांची यादी जाेडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेने केलेले ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगण्याचा अधिकार हा अाॅडिटरला असताे. त्यानंतर जगन्नाथ वाणी यांच्यातर्फे अॅड. अार.एस. शिराेडे यांनी उलटतपासणी घेतली. त्यात लेखापरीक्षाच्या अहवालात इतरही याेजनांचा उल्लेख केला हाेता का? त्या काेणत्या याेजना अाहेत याबाबत प्रश्न विचारला. त्यावर इतर याेजनांचा उल्लेख केल्याचे श्री.कडकसे यांनी सांगून प्रामुख्याने विमानतळ याेजनेचे कर्जासह इतर याेजनांच्या कर्जाबाबत उल्लेख केला अाहे. तसेच वाघूर पाणीपुरवठा याेजना, फुकट बस प्रवास याेजनांची माहिती घेतल्याचे ते म्हणाले.

उत्तर देताना गाेंधळ अाणि वकिलांना समज
उलटतपासणीत प्रश्नांची उत्तरे देताना श्री. कडकसे यांचा गाेंधळ उडत हाेता. त्यामुळे कामकाजात अडचण येत हाेती. प्रश्न नीट एेका अाणि त्याचे शांततेने उत्तर द्या असे न्यायाधीशांनी त्यांना सांगितले. उलटतपासणीत अॅड. प्रमाेद पाटील यांनी साक्षीदाराला सरकारी वकिलांकडून मार्गदर्शन, सल्ला दिला जात अाहे. तसेच न्यायालयही मदत करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या मतावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत कडक शब्दात अॅड.पाटील यांना समज दिली.मात्र बाेलण्याच्या अाेघात हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...