आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 ऑगस्टला कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर करणार - पटेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. इतराप्रमाणे महिन्याभरापूर्वी इच्छुकांचे अर्ज घेतलेले नाहीत. रविवारपासून 5 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारू त्यानंतरची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करून 11 ऑगस्टला उमेदवारी जाहीर करणार असल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. सलीम पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

28 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत अर्जांचे वितरण व स्वीकृती, त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून अहवाल तयार करणे, पक्षाच्या राज्य निवडणूक समितीकडे पाठविणे, त्यानंतर या समितीची मुंबईत बैठक होऊन 11 ऑगस्ट रोजी पक्षाचे उमेदवार जाहीर केले जातील.

शहरात महापौर पद हे हास्यास्पद झाले आहे. लायकी नसलेल्या व्यक्तींना पदे दिल्याने कोठेही जळगावचे नाव सांगताना लाज वाटते. सहा महिन्यांचा महापौर हा खेळ केवळ संपूर्ण देशात जळगावमध्येच आहे. काही चांगले लोक दिले, तेही शेवटच्या ओव्हरमध्ये ती काय खेळणार? असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांशी होणार संवाद
काँग्रेसचे सर्व उमेदवार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. निवडणुकीत मतदारांना कंटाळवाणे वाटतील असे जुने उमेदवार दिले जाणार नाहीत, उच्चशिक्षित युवक, युवतींवर भर असेल.


वेबपेजचे उद्घाटन
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या वेबपेजचे उद्घाटन अँड. सलीम पटेल यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. राधेश्याम चौधरी, राजेश करसगावकर, श्याम तायडे उपस्थित होते. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला सोशल नेटवर्किगशी किमान 500 जण जोडण्याचे टार्गेट देण्यात आले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.