आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम नको, संयम ठेवा! खडसेंच्या भाषणावर विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - युती सरकारमधील मुख्यमंत्र्यांनंतरचे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि महसूल तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी झालेल्या घणाघाती सभेत केलेल्या भाषणाचे राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटले. विरोधकांना दमबाजी करणे ही कुठली लोकशाही? असा सवाल करून सादरेप्रकरणी आपणच सीआयडी चौकशीचे आदेश दिले हा खडसेंचा दावाही आम आदमी पार्टीने खोडून काढला.
आम आदमी पार्टीच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी स्पष्ट केले. तर सुसंस्कृत पक्ष म्हणून टेंभा मिरवणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने जाहीर सभेत वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना पालकमंत्री म्हणून खडसेंनी भाषेचा वापर जबाबदारीने केला पाहिजे अशा शब्दात सर्वच राजकीय पक्षांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
युती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सुभाष चौकात आयोजित सभेत खडसेंनी विविध विकास कामांची घोषणा करतानाच मला छेडण्याचा प्रयत्न केला तर बरबाद व्हाल, अशा शब्दात खडसे यांनी विरोधकांना दम भरला होता. त्याप्रमाणे सादरे आत्महत्या प्रकरण, महापालिकेच्या प्रश्नांवर बोलताना अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली होती. पालकमंत्र्यांच्या या भाषणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

पालकमंत्री म्हणून जबाबदारीने भाषा वापरावी
पालकमंत्रीम्हणून जबाबदारीने भाषा वापरली पाहिजे. खडसे हे विरोधात असते, तर त्यांची भाषा एकवेळ समजली असती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप झालेत. त्यांनी संयमाने उत्तर दिलीत. त्यांच्या भाषेचा दर्जा असा घसरला नाही. भाषणाची भाषा अतिशय चुकीची आहे. महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अशी भाषा वापरली, तर चुकीचे संकेत जातात. स्त्रियांबद्दल अशी भाषा वापरणे चुकीचेच आहे. अॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस
आक्रमक पद्धतीने बोलणे त्यांची शैली
महसूलमंत्रीजे बोलले, ते चुकीचे वाटत नाही. ज्योतिषाने सांगितलेले ते बोलले. आपण राजकीय जीवनात स्त्री-पुरुष असा भेद मानत नाही. त्यामुळे त्यांचा स्त्रीचा अपमान करणे हा हेतू नाही. खडसे जनसेवेची कामे समाजासाठी करतात. त्यासाठी आक्रमक पद्धतीने बोलणे ही त्यांची शैली आहे. याच शैलीत ते सभागृहात तसेच बाहेरही बोलतात. जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या बोलण्याचे समर्थन करेल. उदयवाघ, जिल्हाध्यक्ष,भाजप
अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वचपा काढतात
खडसेंनीचसीआयडी चौकशी लावली, तर ते या अगोदर का बोलले नाहीत? पोलिस अधिकाऱ्यांना का सक्तीच्या रजेवर पाठवले नाही? धमकीयुक्त भाषणं करणं, धमक्या देऊन अधिकाऱ्यांवर वचक ठेवणे आणि दबावात असलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विरोधकांचा वचपा काढणे, ही त्यांची पद्धत आहे. खडसे ज्या महाराजाचा दाखला देतात, त्या महाराजाने खडसे दुसऱ्यांना खेटले तर ते बरबाद होतील, असे सांगितले नाही का? ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अनेक भाषणांतून महिलांचा अपमान केलेला आहे. चंद्रकांत पाटील,
जिल्हाप्रमुख,शिवसेना

धमक्या देणे ही कुठली लोकशाही?
श्रेयघेण्यासाठी नाही; पण कोणी खोटे श्रेय लाटू नये म्हणून स्पष्ट करते. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीआयडी चौकशीची मागणी केली. त्यांना सागर चौधरीच्या कारनाम्यांची माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लक्षात आणून देऊन पोलिसांकडून चौकशी नि:ष्पक्ष होणार नाही, ही बाब लक्षात आणून दिली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी महासंचालक प्रवीण दीक्षितांना सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत. सीआयडी चौकशींवर आमचे लक्ष राहील आणि ती नि:ष्पक्षच होईल. कोणाच्या सांगण्यावर होणार नाही. अनेक खात्यांचे मंत्री असलेल्या नेत्याने ‘उडाणटप्पू’सारखी भाषा वापरली. त्यांना मंत्री राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ते देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. भाषणातून विरोधकांना धमक्या देतात, ही कुठली लोकशाही. महिलेबद्दलचे त्यांचे वक्तव्य हे त्यांची खालच्या पातळीवरील विचार प्रदर्शित करतात. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. प्रीती शर्मा-मेनन, राष्ट्रीय प्रवक्त्या, आप
बातम्या आणखी आहेत...