आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव घ्यायला खडसे म्हणजे शांताबाई नाही, आमदार गुलाबराव पाटलांनी लगावला टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धरणगाव तालुक्यातील भाजपच्या पी.सी.पाटलांसह इतर कार्यकर्त्यांनी केलेल्या पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारावर मी बोलल्यामुळेच एकनाथ खडसेंचा तिळपापड झाला त्यांना या गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश द्यावे लागले. तसेच मला मंत्रिपद मिळण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची शिफारशीची मुळीच गरज नाही आणि शांताबाईचे नाव घेण्यासाठी मी शांताराम देखील नाही, अशी टोला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.

शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार पाटील यांचा पत्रकार परिषदेत समाचार घेत ते मंत्रिपदासाठी माझा नावाचा उपयोग करत असल्याचा टोला लगावला होता. यासंदर्भात आमदार पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. मी सुरुवातीपासूनच चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवत आहे. जिल्ह्यात पॉली हाऊस करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणवणारे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी एकाच दिवसात पॉली हाऊससाठी लाखो रुपयांचे अनुदान लाटले.
पुढे वाचा.. आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करा