आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदीविराेधात काँग्रेस, राष्ट्रवादीने मांडली अांदाेलनाची स्वतंत्र चूल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या नोटबंदीच्या अन्यायी निर्णयाविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जनआक्रोश’ धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत हे आंदोलन झाले. यात मोदी सरकारविरोधात घोषणांसह शासनाचा निषेध करण्यात आला. एक वाजेनंतर मात्र आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळावरची उपस्थितीही खालावली. अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावून काढता पाय घेतला.
 
राष्ट्रवादी पक्षातर्फे जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन, जिल्हा महानगराध्यक्ष परेश कोल्हे, गफ्फार मलिक, युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, वाय.एस. महाजन, विजया पाटील, अॅड. सचिन पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, काशिनाथ इंगळे, रोहन सोनवणे, कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाट, लता मोरे, विजय नारखेडे, अयाज अली िनयाज अली, माधुरी पाटील, प्रदीप भोळे, रवी देशमुख, महेश भोळे, जयप्रकाश चांगरे, अॅड. राजेश गोयर उपस्थित होते. 

काँग्रेसच्या मागण्या 
बँकेतूनचलन काढण्यासाठी असलेली मर्यादा उठवावी. 
भोजनासाठीदिलेल्या धान्याची किंमत वर्षासाठी निम्मे करावी. 
दुकानदारउद्योजकांना वर्षापर्यंत ५०% सूट द्यावी. 
बीपीएलधारकमहिलेच्या खात्यात २५ हजार जमा करावे. 


काँग्रेसपक्षाच्या शहर ग्रामीण शाखेतर्फे स्वतंत्र आंदोलन करण्यात आले. दुपारी वाजता शहर जिल्हा काँग्रेसतर्फे, तर यानंतर तालुका ग्रामीण काँग्रेसच्या महिलांनी तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. शहर काँग्रेसच्या आंदोलनावेळी महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. ए.जी. भंगाळे, कपिल अहमद, अरुणा पाटील, सकिना तडवी, मीना जावळे, मंगला श्रीवास्तव, मनीषा गवारे, कल्पना सपकाळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
 
महिला काँग्रेस 
तालुका ग्रामीण काँग्रेस शाखेने काँग्रेस भवनापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेत थाळीनाद आंदोलन केले. तालुकाध्यक्ष संजय वराडे, ज्ञानेश्वर पाटील, जगदीश गाढे यांनी निवेदन दिले. 
जळगाव तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर ‘थाळीनाद’ करताना महिला. 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अांदाेलन करताना पदाधिकारी. 
 
काँग्रेसतर्फे ‘थाळीनाद’ अन‌् निदर्शने, राष्ट्रवादीचे ‘जनआक्रोश’ 
नाेटबंदीविराेधात राष्ट्रवादी काँग्रेसने साेमवारी वेगवेगळ्या ठिकाणी अांदाेलन करून स्वतंत्र चूल मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जनआक्रोश’ धरणे आंदोलन केले, तर काँग्रेसच्या शहर ग्रामीण शाखेतर्फे तहसील कार्यालयासमोर स्वतंत्र थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हाय हाय...’, ‘अब की बार, बस कर यार’, ‘हमारा पैसा हमेही दो...’ या विविध घोषणांनी अांदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून साेडला हाेता.