आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीचा परिणाम; शहरात घरफाेड्यांना विराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चलनातील५००-१०००च्या नोटबंदीचा फटका गुन्हेगारी क्षेत्रालाही बसला आहे, असा सूर शहरातून निघू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत शहरात तीनच घरफाेड्या झाल्याची नोंद आहे. तर एक बॅग चाेरीची घटना घडली अाहे. मात्र, माेबाइल आणि माेटारसायकल चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली अाहे.

रस्त्याने पायी जाणाऱ्यांच्या हातातील तसेच माेटारसायकलला लटकवलेली पिशवी पळवणारे, दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे चोरटे सद्य:स्थितीत शांत झाले आहेत. चोरीच्या घटनांसह हाणामारी, फसवणूक अशा गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरात रोज किमान दोन ते तीन गुन्हेगारी घटनांची नोंद होत असताना, या घटनांचे प्रमाण अचानक घटले आहे. चलनाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेली परिस्थिती हेच त्या मागील कारण असल्याचा सूर पोलिसांमधून निघत आहे.

जिल्ह्यासह शहरातील गुन्हेगारीचा आलेख पंधरा दिवसांमध्ये खाली आला आहे. हाणामारीच्या तुरळक घटना सोडल्यास चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट आली आहे. दरम्यान, शहरात चोरीच्या केवळ तीनच घटना घडल्या अाहेत.

२८ माेबाइल, माेटारसायकली लंपास
नाेटबंदीकेल्यानंतर नाेव्हेंबर ते २२ नाेव्हेंबरपर्यंत केवळ तीन घरफाेड्या झाल्या. त्यात १० नाेव्हेंबर राेजी यशवंतनगरात तर त्याचदिवशी रात्री भारतनगरात चाेरी झाली. मात्र, त्यानंतर एकही चाेरी झाली नाही. तर १४ नाेव्हेंबर राेजी रथाेत्सवात २७ माेबाइल तर १५ नाेव्हेंबर राेजी नवीपेठेत असे एकूण २८ माेबाइल चाेरी झाले अाहेत. त्यामुळे चाेरट्यांनी अाता राेकडकडे पाठ फिरवून वस्तूंवर हात साफ करण्याचे काम सुरू केले अाहे.

मोबाइल चोरट्यांना शोधण्याचे आव्हानच
चलनातीलबंद झालेल्या पैशांसंबंधी गुन्हेगारी कमी झाली असली तरी मोबाइल, माेटारसायकल चोरटे मात्र सक्रियच आहे. गर्दीच्या ठिकाणाहून तसेच सार्वजनिक स्थळांवरून मोबाइल, माेटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बातम्या आणखी आहेत...