आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चलनातील कोंडी फुटत नसल्याने अडचणीत वाढ; निम्म्या बँकांचे एटीएम बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील प्रमुख बँकांचे सर्वच एटीएम बंद असल्याची स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ५०० रुपयांची नवीन नोट अद्याप उपलब्ध झाल्यामुळे कोंडी फुटत नसल्याचे काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. शहरातील एटीएममध्ये दिवसभरात एकदाच नोटांचा भरणा केला जात असल्याने दुपार होताच अनेक ठिकाणचे एटीएम केंद्र बंद पडत असून, त्यामुळे साहजिकच बँकांंवर ताण येत अाहे. शिवाय बँका आणि एटीएम दोन्हींसमोरील रांगाही अद्याप कायम आहेत.
नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. त्याच दिवसापासून अनेक बँकांचे एटीएम बंद पडलेले आहेत. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढत गेली. विविध उपाययोजना करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे; पण हा दिल्लीतला निर्णय गल्लीपर्यंत पोहाेचण्यास उशीर होतो आहे. काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अडचणीत चांगलीच भर पडली आहे. काही प्रमुख बँकांचे एटीएम नोव्हेंबरपासूनच बंद आहेत, तर काहींनी मध्ये दाेन-तीन दिवस सुरू केले होते. मात्र, नोटा कमी ग्राहक जास्त असल्यामुळे एटीएम पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. सध्या ज्या बँकांचे एटीएम केंद्र सुरू आहेत तेथे चांगलाच ताण पडला आहे, तर बंद असलेल्या ठिकाणी ग्राहकांची गैरसोय होते आहे.

मंगळवारीएटीएम केंद्रांचा घेतलेला आढावा असा
बँक ऑफ महाराष्ट्र : शहरात
पाच एटीएम आहेत. मंगळवारपर्यंत पाचही बंद.
आयडीबीआय : शहरात पाच एटीएम आहेत. मंगळवारपर्यंत पाचही बंद.
सेंट्रल बँक : शहरात तीन एटीएम आहेत. मंगळवारपर्यंत तिन्ही बंद
इको बँक : शहरात एक एटीएम आहे. मंगळवारपर्यंत तेही बंद.
आयसीआयसीआय : एटीएम सुरू.
स्टेट बँक ऑफ इंडिया : शहरात १० एटीएम आहेत. मंगळवारपर्यंत सुरू.
जळगाव जनता सहकारी बँक : शहरात तीन एटीएम आहेत. पैकी मंगळवारी सायंकाळी दाेन सुरू केले.
जळगाव पीपल्स सहकारी बँक : शहरात सहा एटीएम आहेत. दोन बंद.

१०० रुपयांच्या नवीन, जुन्या नोटा मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. एटीएममध्ये एका वेळी १०० रुपयांच्या चार हजार नोटा (४ लाख रुपये) भरता येतात. त्या २०० ग्राहकांना प्रत्येकी २० नोटा (२ हजार रुपये) पुरतात. एका दिवसात एकच वेळा एटीएममध्ये पैसे भरता येतात. त्यामुळे सर्वच लोकांना नोटा मिळत नाहीत.

१०० रुपयांच्या चांगल्या अवस्थेतील जुन्या किंवा नव्या नोटाच एटीएममध्ये भरता येतात. नोटा व्यवस्थित हाताळलेल्या नसतील, फाटलेल्या, जास्त घडी पाडलेल्या असतील तर त्या नोटा एटीएममध्ये भरता येत नाहीत. परिणामी, चलन फिरण्यास अडचण होते आहे.

५०० रुपयांची नवीन नोट उपलब्ध झाल्यास दोन हजार रुपयांची नोट सुटी करणे शक्य होईल. त्यामुळे ग्राहकदेखील बँकांमधून दोन हजार रुपयांची नोट घेण्यास तयार होतील.
बँकेतून दोन हजार रुपयांची नोट घेण्यास ग्राहक तयार होत नाहीत. जास्तीत जास्त लोक १०० रुपयांच्या नोटांची मागणी करतात. यामुळे बँकांमध्ये वाद होत आहेत. या वादात वेळ वाया जातो. परिणामी, जास्त व्यवहार होऊ शकत नाही. त्यामुळे बँकांमध्ये आणि बाहेरही नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. एटीएमवरही रांग कायम राहते.

सर्व बँकांमध्ये सध्या जुन्या ५०० एक हजार रुपयांच्या नोटांची मोजणी, छाननी सुरू आहे. एटीएममध्ये भरता येतील अशा १०० रुपयांच्या नोटादेखील बँक कर्मचाऱ्यांना वेगळ्या काढाव्या लागत आहेत. नेमक्या त्याच वेळी ग्राहकांची रांगदेखील समोरच असते. अशात कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो आहे. त्यामुळे ग्राहकांशी विनाकारण वितंडवाद होतो.
शनी मंदिराजवळील स्टेट बँकेच्या एटीएमसमोर लागलेली रांग.
बातम्या आणखी आहेत...