आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटांचा तुटवडा कायम; बँकेतून पेन्शनर्सला मिळतेय कमी रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हजार,पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर उद््भवलेल्या परिस्थितीमुळे बँकांमध्ये शंभराच्या नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बँका ग्राहकांना पैसे देताना हात आखडता घेत आहेत. सोमवारी पेन्शन काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बँका देतील तेवढी रक्कम घेऊन माघारी परत यावे लागले. तर दुसरीकडे एटीएमवर नागरिकांच्या रांगा कायम दिसून अाल्या.

नोटा चलनातून रद्द होण्याच्या निर्णयाला २० दिवसांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना असमान चलनाचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यातच बँकांमधील नागरिकांच्या रांगा कमी झाल्या असल्या तरी नाेटांचा तुटवडा अद्याप कायम आहे. मागणी पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाला अाहे. सोमवारी बँकांमध्ये सेवानिवृत्त नागरिक पेन्शन काढण्यासाठी गेले होते. त्यांना मिळत असलेल्या रकमेच्या निम्मी रक्कमही देण्यास बँकांकडून नकार देण्यात आला. पाचशेच्या नवीन नोटा चलनात येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल, असे अग्रणी बँकेचे उपव्यवस्थापक बी.एस.मराठे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.

शनिवार रविवारी बँका बंद असल्याने सोमवारी बँकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. एटीएमसमोरही माेठ्या रांगा लागल्या होत्या. दाेन दिवसांनंतर बँकांमध्ये राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार होतील. त्यामुळे बँकांमधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून कमी चलनपुरवठा होत राहिल्यास येणाऱ्या काही दिवसांत बँकांच्या अडचणी अधिकच वाढतील.
बातम्या आणखी आहेत...