आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

149 उत्पादकांविरुद्ध खटल्यासाठी प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुदतीत वार्षिक विवरण पत्र सादर न करणा-याजिल्ह्यातील 149 उत्पादकांविरुद्ध नाशिक येथे न्यायनिर्णय अधिका-यांकडे याबाबत खटला दाखल करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रस्ताव नाशिक येथे पाठवण्यात आले असून या उत्पादकांना दंडाच्या रकमेसह खटल्यात दिलेल्या दंडाचाही भरणा करावा लागेल.

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक अन्न पदार्थ उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासंदर्भातील माहितीचे वार्षिक विवरणपत्र दरवर्षी 31 मेपर्यंत सादर करावे लागते. जिल्ह्यातील 327 उत्पादकांपैकी 136 उत्पादकांनी मुदतीत माहिती दाखल केली आहे. मात्र, 42 जणांनी मुदतीनंतर माहिती दाखल केल्याने प्रतिदिन 100 रुपयाप्रमाणे त्यांच्याकडून एकूण 4 लाख 87 हजार रुपये दंड आकारण्यात आला. तर अजूनही 149 जणांनी विवरण पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातर्फे या उत्पादकांवर नाशिक येथील न्यायनिर्णय अधिकाºयांकडे खटले दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आले असून दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

मोहीम राबवणार
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. यात उत्पादकांनी व विक्रेत्यांनी शिळे अन्न पदार्थ, रंगयुक्त पदार्थ व पाणी विक्री उघड्यावर करू नये. स्वच्छता ठेवावी यासंदर्भात तपासणी करण्यात येईल.