आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 फटाके विक्रेत्यांना दिली नोटीस, प्रांताधिकाऱ्यांच्या पत्रानंतर मुख्याधिकाऱ्यांची कार्यवाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री बंदीचा आदेश दिला आहे. यानुसार पालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील ५२ फटाके विक्रेत्यांना दिलेले तात्पुरते परवाने रद्द करुन दुकाने तत्काळ हटवण्यासाठी बुधवारी नोटीस दिली. दुकाने हटवल्यास मुख्याधिकारी बाविस्कर यांनी कारवाईचा इशारा दिला. 
 
प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना १३ ऑक्टोबरला पत्रव्यवहार करुन रहिवासी भागात फटाके विक्रीचे परवाने दिले असल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ते रद्द करावेत, असे आदेश दिले होते. हे पत्र पालिकेला बुधवारी (दि.१८) दुपारी वाजता प्राप्त झाले. त्यानुसार मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी फटाके विक्रीच्या ५२ दुकानदारांना नोटीस बजावत तात्पुरत्या दुकानांना दिलेली परवानगी रद्द केली. त्यात नोटीस मिळताच फटाके विक्रीची दुकाने हटवावी, अन्यथा पालिकेकडून कारवाई केली होईल, असा इशारा दिला आहे. फटाके विक्रेत्यांना शहराबाहेर दुकानांसाठी जागा शोधावी लागणार आहे. डॉ.आंबेडकर मैदानावर विक्रेत्यांनी फटाक्यांची दुकाने थाटली आहे. मात्र, तेथे नियमानुसार खबरदारीच्या अपेक्षित उपाययोजना नाहीत. 
 
बातम्या आणखी आहेत...