आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जिल्हा मार्च २०१८ पूर्वी हागणदारी मुक्त करण्याचे जळगाव जिल्हा परिषदेला उद्दिष्ट दिले अाहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शनिवारी स्वच्छ भारत याेजनेचा अाढावा घेतला. त्यात ८० टक्क्यांपेक्षा कमी काम झालेल्या गावातील ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात अाली. गावे हागणदारी मुक्त झाल्याशिवाय १४व्या वित्त अायाेगाचा निधी वितरीत केला जाणार नसल्याने या अभियानाचा अाढावा घेण्यात अाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शौचालय बांधकामाच्या प्रगतीचा अाढावा घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज सभागृहात बैठकीचे अायाेजन केले हाेते. या बैठकीला सर्व गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी तसेच ३०० पेक्षा जास्त उद्दिष्ट प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित हाेते. या वेळी गावनिहाय याेजनेचा अाढावा घेण्यात अाला. शौचालयाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात अाल्या.
दैनंदिन प्रस्ताव, जिल्हा स्तरावर पाठवण्यात अालेले प्रस्ताव, शौचालयांचे फाेटाे अपलाेडिंग कामकाज, घरकुल स्वत: शौचालय बांधलेल्या लाेकांच्या याद्या अयद्यावत करण्याचे काम या संदर्भात प्रस्तावाची माहिती घेतली. ज्या ग्रामसेवकांची कामे समाधानकारक नाहीत, त्यांची दप्तर तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना या वेळी देण्यात अाल्या. जिल्ह्यात शौचालयांचे फाेटाे अपलाेडींगचे केवळ ६७ टक्केच काम झाल्याची माहिती या वेळी देण्यात अाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.