आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापसी नकाे, पुरस्कार स्वीकारुन शत्रूला नमवा; कादंबरीकार भालचंद्र नेमाडेंचा साहित्यिकांना सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-पुरस्कार वापसी’चे वारे मध्यंतरी आले होते. मात्र, तुमच्या शत्रूला संपवायचे असेल तर पुरस्कार स्वीकारलाच पाहिजे. पुरस्कार मिळाला की चार लोक आपल्याविषयी चांगलं बोलतात. त्यामुळे आपल्याला शत्रूवरही विजय मिळवता येतो. म्हणून साहित्यिकाने पुरस्कार घ्यावा’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी व्यक्त केले. 

भवरलाल अॅण्ड कांताई जैन फाऊंडेशन आणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी सर्वाेत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाबाई पुरस्कार कल्पना दुधाळ यांना तर, सर्वोत्कृष्ट कवी ठोंबरे पुरस्कार नंदुरबारचे वाहरू सोनवणे यांना, तसेच गद्यलेखनासाठीचा ना.धो. महानोर पुरस्कार देऊन  कोल्हापुरचे किरण गुरव यांना गाैरविण्यात अाले. ५१ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.  व्यासपीठावर कवी ना.धो. महानोर, जैन इरिगेशचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, ज्योती जैन उपस्थित होते. या वेळी माहितीपटातून पुरस्कारार्थीच्या कार्याची माहिती देण्यात आली.

नेमाडे म्हणाले, ‘समाजावर धर्माचा पगडा वाढत आहे. मात्र, हल्लीचा धर्म ‘ऑर्गनाइज’ स्वरूपाचा आहे. ख्रिस्ती धर्माने जगावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुस्लिम धर्माने थांबवले. ऑर्गनाइज धर्मामुळे हिंसा वाढते आहे. हिंदू धर्म अजूनतरी ‘ऑर्गनाइज’झालेला नाही. तो आपापल्या परंपरेनुसार देव- देवतांची पूजा-अर्चा करीत आहे. आता आदिवासी स्वत:चा धर्म प्रस्थापित करू पाहतोय. आदिवासींनी आपापल्या परंपरा जोपासाव्या, पण धर्माच्या भानगडीत पडू नये’, असा सल्ला नेमाडे यांनी दिला.
 
खान्देशात साहित्यिकांचे प्राबल्य
खान्देशात साहित्यिक, कवींचे मोठे प्राबल्य राहिले आहे हे आपणासाठी भुषणावह आहे. यातून आपण महाराष्ट्राशी जोडले गेलो आहोत. भविष्यात जळगाव साहित्याचा केंद्रबिंदू राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या मराठी साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. अनेक साहित्य शेतीविषयक आहे. त्यामुळे  मातीतून कवी, साहित्यिकांचा उदय झाला असून त्या मातीला विसरता कामा नये,असेही नेमाडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...