आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगीपाठोपाठ आता ‘चायनीज’वर गंडांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मॅगी नूडल्सच्या पाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक शहरात गल्लोगल्ली उभ्या राहणाऱ्या चायनीज पदार्थांच्या गाड्यांवर गंडांतर येणार आहे. अाराेग्याला हानिकारक ठरणाऱ्या तसेच प्रमाणापेक्षा जास्त शिसे अाणि माेनाेसाेडियम ग्लुटामेट अाढळल्याने मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात अाली. मात्र, त्यापेक्षा जास्त मानाेसाेडीयमचा वापर करणाऱ्या चायनीजच्या गाड्यांवर काय कारवाई करण्यात अाली, याची माहिती नगरविकास विभागाने महापालिकेकडून मागवली अाहे. यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करण्यात अाली अाहे.
वादाच्या भाेवऱ्यात अडकलेल्या मॅगी नूडल्सचे उत्पादन हे नेस्ले इंडियाने देशभरातून मागे घेतले अाहे; तर राज्यातून मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात अाली अाहे. एकीकडे ही कारवाई केली जात असताना दुसरीकडे मात्र चायनीज गाड्यांवर मॅगीपेक्षा अनेक पटीने जास्त माेनाेसाेडियम ग्लुटामेट (एमएसजी) चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरण्यात येत अाहे. या चायनीजच्या गाड्या संपूर्ण राज्यात शहर जिल्हाभरात अाहेत. यापैकी किती जणांकडे व्यवसाय परवाने अाहेत? अन्न अाैषध प्रशासनाकडून त्यांची वेळाेवेळी तपासणी हाेते का? परवाना नसलेल्या वा एमएसजीचे प्रमाण जास्त असल्याबद्दल किती व्यावसायिकांवर कारवाई करण्यात अाली? याची माहिती मागवण्यात अाली अाहे. दरम्यान, काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांनी याप्रकरणी लक्षवेधी मांडली असून त्यानुसार नगरविकास विभागाने जळगावसह राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांकडून माहिती मागवली आहे.

शहरात किती गाड्या
जळगावशहरातही गल्लोगल्ली चायनीज पदार्थांच्या गाड्या उभ्या राहतात. या गाड्यांवर व्हेज- नॉनव्हेज हाका नूडल्स, अमेरिकन चाॅपसी, शेझवान नूडल्ससारखे पदार्थ विकण्यात येतात. चमचमीत आणि मसालेदार चायनीज पदार्थ खाण्यासाठी दररोज खवय्यांची गर्दी असते. या गाड्यांपैकी किती गाड्यांकडे अन्न अौषध प्रशासनाची परवानगी आहे? त्याचप्रमाणे रस्त्यावरील गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची प्रशासनाने तपासणी केली आहे का? याबाबतचा तपशील नगरविकास खात्याने मागवली अाहे.
बातम्या आणखी आहेत...