आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची पाणीपुरवठा योजना प्राधिकरणाकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेच्यापाणीपुरवठा योजनेचे केंद्र शासनाच्या िनधीतून काम सुरू करण्यात आले आहे. योजनेसाठी १३६ कोटी रुपयांचा िनधी प्राप्त झाला आहे; परंतु योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच ही योजना जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी मंत्र्यांकडे केली हाेती. त्याप्रमाणे योजना प्राधिकरणाकडे देण्याची तयारी सुरू झाली आहे.
महापालिकेची पाणीपुरवठ्याची महत्त्वाकांक्षी समजली जाणारी १३६ कोटी रुपयांची योजना, आता महापालिकेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे. योजनेची निविदा काढण्यापासून ती वादात सापडली आहे. शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी न्यायालयात याविरोधात याचिका टाकली आहे. योजनेच्या प्रत्यक्ष कामाला नगावबारी भागातून सुुरुवात झाली आहे; परंतु काम सुरू असताना ठेकेदार ते मनमानीपणे करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामावर जाऊन त्याचे मोजमाप करून दाखवले. लेखी लिहून घेतले. त्यानंतरही काम नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप सुरू आहे. त्यासाठी अनेकदा निवेदने, आंदोलन करण्यात आले. वापरण्यात येणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. सर्व बाजूने आरोपाच्या फैरी सत्ताधारी प्रशासनावर झाडण्यात येत आहे. त्याचे त्यांनी वेळोवेळी खंडनही केेले आहे. सभेत दरवेळा हा प्रश्न गाजतो आहे. आमदार अनिल गोटे यांनीही याबद्दल मंत्रालयात बैठक घेऊन योजना प्राधिकरणाकडे द्यावी, असे सांिगतले. त्याचप्रमाणे महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंजा पी. आर. दरेवार यांच्यावरही आरोप होऊन त्यांची बदली करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर आता मंत्रालयातूनच योजना प्राधिकरणाकडे देण्यात येत आहे. त्याचे प्राथमिक कागदोपत्री सोपस्कार लवकरच पार पाडण्यात येतील. प्राधिकरणाकडे सर्व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाचेच यावर नियंत्रण राहणार आहे. लवकरच प्राधिकरणाकडे देण्यासाठी हालचाली मनपातून होणार आहेत.