आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या काठीत कॅमेरा अन‌् जीपीएस, हायटेक काठीसाठी अडीच हजार रुपये खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाेलिसड्यूटी करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास घडलेल्या घटनेचे संपूर्ण पुरावे मिळावे यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने एक अत्याधुनिक काठी तयार केली अाहे. यात एलईडी लाइट, कॅमेरा, व्हाॅइस रेकॉर्डर, जीपीएस सिस्टिम अाणि मेटल डिटेक्टर अशा सर्व सुविधा उपलब्ध अाहेत. या काठीमुळे काही अंशी का हाेईना गुन्हेगारीवर वचक बसणार अाहे.

सबळ पुरावे उपलब्ध हाेत नसल्यामुळे अनेकदा आरोपी निर्दाेष सुटतात. ही समस्या अाेळखून गुन्हेगारीवर वचक बसण्याच्या उद्देशाने भुसावळ येथील मूळ रहिवासी नाशिकच्या संदीप फाउंडेशन कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्चचा विद्यार्थी चेतन नंदाणे (वय २१) याने पाेलिसदादासाठी हायटेक काठी तयार केली आहे. या काठीत चेतन याने काही बदल केले अाहेत. काठीच्या वरच्या बाजूला सहा एलईडी लाइट बसवले आहेत; त्यामुळे रात्रीच्या वेळी उजेड मिळेल. त्या खालोखाल पाच मेगा पिक्सेलचा कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डिंग यात आहे. यातून घटनांचे चलचित्रण आवाज रेकॉर्ड होईल. मधल्या बाजूला जीपीएस सिस्टिम आहे. त्यामुळे अडचणीच्या ठिकाणी सापडलेल्या पोलिसाला मदत मिळू शकेल. तर सर्वात खाली मेटल डिटेक्टर आहे. त्यामुळे दंगा, हाणामारीच्या ठिकाणी पकडलेल्या संशयितांची तपासणी करून त्यांच्याकडे असलेली लोखंडी हत्यारे पोलिस हस्तगत करू शकतील. ही काठी चेतनने तत्कालीन डीजीपी प्रवीण दीक्षित यांना दाखवलेली आहे. दीक्षित यांनी सुचवलेले बदल त्याने केले अाहेत. काठी तयार करण्यासाठी चेतनला महिन्यांचा कालावधी लागला असून त्यासाठी अडीच हजार रुपये खर्च आला अाहे.

जळगावची खासबातमी आजोबांसाठीही काठी
चेतनयाने एकदा दोन वृद्धांना अंधारात पडताना पाहिले. या घटनेवरून व्यथित होऊन त्याने आजोबांसाठीदेखील एलईडी लाइट असलेली काठी तयार केली आहे. दोन तास बॅटरी चार्ज केल्यानंतर तीन तास हे लाइट सुरू राहतात.
बातम्या आणखी आहेत...