जळगाव - इच्छा असली तरी शासकीय क्लिष्ट प्रक्रियेमुळे नोंदणी विवाह पद्धतीकडे अनेक जण पाठ फिरवतात. मात्र, यापुढे कायदेशीर नोंदणी विवाह करणे सोपे होणार आहे. शासकीय कार्यालयाच्या चकरा न मारता ऑनलाइन पद्धतीने कायदेशीररीत्या विवाह करता येणार आहे. या ई-मॅरेज प्रकल्पात लग्नाचा दाखलाही ऑनलाइन मिळणार आहे.
विवाह नोंदणी प्रक्रिया जास्त किचकट असते. महिनाभर आधी नोटीस, कागदपत्रांची पूर्तता यासाठी वधू आणि वर दोघांनाही शासकीय कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागतात. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणे अनेकांकडून टाळले जाते. मात्र, यापुढे ही सर्व प्रक्रिया घरबसल्या होईल. विदेशात बसलेली वधू किंवा वर वेब कॅमे-यासमोर बसून विवाह करू शकेल. त्याची कायदेशीर नोंदणी होईल .
पुढे वाचा ... नोंदणीविषयी..