आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिस्ट्रीसिटरांची माहिती आता एका क्लिकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा पोलिस दलाने गेल्या १० वर्षांतील जिल्ह्यातील गुन्ह्यांचे, गुन्हेगारांची नावे असलेले सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे या सॉफ्टवेअरची गुन्हे शाेधण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारीवर तत्काळ कारवाई करा, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी क्राइम मिटिंगमध्ये दिल्या.

जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत घडलेले गुन्हे, त्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या नावांचे सॉफ्टवेअर पोलिसांच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. यात गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची पद्धत कोणती होती, आदीबाबत माहिती टाकण्यात आली आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर त्या गुन्हेगाराने वापरलेली पद्धत यापूर्वी कोणत्या गुन्हेगाराने वापरली आहे का? हे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सहज समजेल. परिणामी, पोलिसांना त्या गुन्हेगारापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. लवकरच हे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले जाणार आहे. तसेच हे सॉफ्टवेअर यशस्वी झाल्यास नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना दाखवून सर्व जिल्ह्यांमध्ये हीच पद्धत अवलंबली जाणार आहे.
गस्तीत वाढ करा : वाढत्या गुन्हेगारीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई करा, घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवून जिल्ह्याच्या सर्व सीमांवर नाकेबंदी सुरू करण्याच्या सूचना बैठकीत अधीक्षकांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गुन्हेगार दत्तक याेजनेचा आढावाही त्यांनी घेतला.
महिलांच्या सुरक्षेसाठी समिती
महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी जलि्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य असणार आहेत. नियमित घडणाऱ्या घटनांच्या ठिकाणी सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट लावण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

जिल्ह्याचा कन्व्हेन्शन रेट फक्त २३ टक्के
जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमधील एकूण गुन्ह्यांपैकी फक्त २३ टक्के गुन्ह्यांमध्येच आरोपींना शिक्षा झाल्याची सरासरी आहे. त्यामुळे शिक्षा देण्याचे हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या.
तीन दिवसांत १०५ जणांवर कारवाई
मुंबईत विषारी दारूमुळे झालेल्या मृत्युकांडानंतर जलि्ह्यातील गावठी, अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाने कारवाई सुरू केली आहे. जलि्ह्यात तीन दविसांत १०२ ठिकाणी कारवाई करून १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन लाख २४ हजार ९२४ रुपयांचा दारू बनवण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...