आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टर, दवाखाने ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत, तालुका स्तरावर शिबिरे घेऊन करणार जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रुग्णावर चुकीचे उपचार करणारे खासगी दवाखाने आणि डॉक्टरही अाता ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत येतात. मात्र, याबाबत प्रभावी जनजागृती झाली नसल्याने अपप्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे ग्राहक न्यायमंचाने ग्राहक कायद्यांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून, लवकरच तालुकास्तरावर शिबिरे घेतले जाणार अाहे.
ग्रामीण भागात बरेच डॉक्टर अॅलाेपॅथीची औषधे रोगनिदानाकरिता वापरतात. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक अािण शारीरिक नुकसान झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक याबाबत न्यायालयात दाद मागू शकतात. अशा प्रकरणात डॉक्टरांचा दोष असल्याचे सिद्ध करण्याची सर्व जबाबदारी तक्रारदारावर असते. त्यासाठी संबंधित डॉक्टरने सहकार्य करणे बंधनकारक आहे. तसेच हलगर्जीपणा झाला असल्याचा दाखला देणेही बंधनकारक आहे. मात्र, याप्रकरणी विनाकारण तक्रार केल्याचे अाढळून अाल्यास तक्रारदारास १० हजार रुपये दंडाची शिक्षा देखील होते.

तक्रार दाखल करण्यासाठी ही कागदपत्रे हवीत

केसपेपर,अॅडमिट कार्ड,उपचार कार्ड, औषधांची सूची, रुग्णाचे जुने सध्याचे अहवाल ही कागदपत्रे तक्रार दाखल करताना द्यावी लागतात.

नागरिकांनाे, या आजारांबाबत करता येईल तक्रार

इंजेक्शन देताना काळजी घेणे, दंडात जखम होणे, हात लुळा पडणे, टॉन्सिल वा अॅपेंडिस, गर्भाशय काढून टाकणे, गर्भारपणात गर्भावर दृश्य परिणाम होणे, स्टेरॉइडमुळे गर्भाचे तोंड बंद हाेणे, शस्त्रक्रियेनंतरचे दुखणे, गर्भनिरोधक गोळ्यांनी रक्तदाब हाेणे, गर्भाशयावर परिणाम होणे, कर्करोग होणे, स्टेरॉइड औषधांमुळे जठरावर व्रण आणि हाडवैद्याच्या उपचाराने हाड माेडणे, क्षयरोग, मधुमेह, रक्तदाब आजार वेळीच ओळखता निरर्थक उपचार करणे.

अहवाल बंधनकारक

ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात संबंधित डॉक्टरची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सादर केला जातो. तसेच फौजदारी गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यासाठी समिती गठीत करून त्यानंतर न्यायालयात अहवाल सादर केला जातो. डॉ.किरण पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक

प्रबोधन गरजेचे

ग्राहक न्यायमंचाकडे दोषी डॉक्टरविरुद्ध दावा दाखल झाल्यास ग्राहकांना न्याय मिळतो. मात्र, त्यासाठी ठोस पुरावे आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ग्राहक कायद्यांची प्रभावीपणे जनजागृती हाेण्यासाठी ग्राहक न्यायमंच तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करणार आहे. विजय मोहरीर, ग्राहक पंचायत प्रतिनिधी