आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now It Possible To Complaint Ugc Office Against Ranging

रॅगिंग करणा-याची थेट यूजीसीकडे करता येणार तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शप्प्रवेरक्रियेत झालेला अन्याय असो की, एखाद्याने केलेली रॅगिंग... याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसेल तर विद्यार्थ्यांना थेट यूजीसीच्या वेबसाइटवर तक्रार करता येणार आहे. तक्रारीचे निरसन करण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करावेत, अशी सूचना यूजीसीने महाविद्यालयांना केली आहे.

रॅगिंगसंदर्भात भांडूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठाकडून न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यानुशंगाने प्रवेशासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क, प्राध्यापकांकडून होणारा दुजाभाव, विद्यार्थ्यांकडून होणारी रॅगिंग अथवा पेपर तपासण्यात झालेली चूक या सर्व तक्रारींची दखल आता यूजीसी घेणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींकडे व्यवस्थापन कानाडोळा करते.

परिणामी, काही विद्यार्थी निराश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतात. गोदावरी महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणा-या पश्चिम बंगालमधील विद्यार्थिनीवर रॅगिंगवरून आत्महत्या करण्याची वेळ आली होती. या प्रकारांना आळा घालण्यासाठी यूजीसीने हे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांनी www.ugc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थी पोर्टल या पर्यायावर जाऊन तक्रारी नोंदवाव्यात.
संघटनांना चाप
महाविद्यालय तसेच विद्यापीठस्तरावर विविध राजकीय पक्षांच्या युवक, विद्यार्थी संघटना आहेत. या संघटनांचे पदाधिकारी अनेकदा तक्रारग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची आश्वासने देतात. यूजीसीच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना न्याय मिळणार.

तत्काळ दखल
आतापर्यंत विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींकडेच तक्रार केली जात होती. परंतु, तक्रारग्रस्तांना न्याय मिळेलच, याची खात्री नव्हती. प्राप्त तक्रारींचे निरसन करण्याच्या सूचना यूजीसी थेट संबंधित महाविद्यालयांना पाठवणार आहे. त्याचा अहवाल महाविद्यालयांना पुन्हा यूजीसीकडे द्यावा लागणार असल्याने निर्णयात पारदर्शकता येईल.

नोडल अधिकारी नेमा
सर्वच विद्यापीठातील संलग्नीत महाविद्यालयांना प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये पूर्वीपासूनच नोडल अधिकारी नियुक्त असेल तर त्यांनाच अधिकार देण्याचे स्पष्ट केले आहे. नोडल अधिका-याची नेमणूक केल्यानंतर महाविद्यालयांनी त्यांची यादी विद्यापीठाकडे पाठवावी.