आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव शहरात आता तीन दिवसाआड पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावकरांना 1 एप्रिलपासून आणखी 25 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. वाढती पाणीटंचाई, धरणांतील घटता पाणीसाठा व बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी पाण्याची हानी लक्षात घेऊन शहराला आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी महापालिकेला दिले आहेत. जळगाव शहराला नोव्हेंबर 2012पर्यंत एका दिवसाआड पाणीपुरवठा होत होता; मात्र कमी मान्सूनमुळे 15 नोव्हेंबर 2012 रोजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.