आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महावितरण औरंगाबादला जाेडणार; १५ ऑगस्टचा मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देशातील तीन जिल्ह्यांचे महावितरणचे जळगाव परिमंडळ अाता अाैरंगाबाद विभागाशी जाेडण्याचा निर्णय वीज मंडळाने घेतला अाहे. यासाठी १५ अाॅगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात अाला अाहे. दरम्यान, विभाजनामुळे सामान्य ग्राहकांना थकबाकी, वीजदरवाढ भारनियमनाचा प्रश्न उपस्थित होणार अाहे. त्यामुळे या विभाजनाला परिमंडळातील अभियंता, विविध वीज कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला अाहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार हे तीन जिल्हे मिळून दहा वर्षांपूर्वी जळगाव परिमंडळाची निर्मिती करण्यात आली होती. आजपर्यंत या परिमंडळाचे सर्व प्रशासकीय कामकाज हे मुंबई कार्यालयाकडून केले जात अाहे. वीज मंडळाने अाता हे परिमंडळ अाैरंगाबाद कार्यालयाला जाेडण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे ही सर्व कामे त्या कार्यालयामार्फत हाेणार अाहेत. विभाजनाबाबत ३० जुलैला विभागीय संचालकांसह कार्यकारी संचालक विविध पदांसाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. लवकर अाैरंगाबादला नवीन कार्यालय तयार करण्यात येणार अाहे. त्या ठिकाणी विभागीय संचालक, कार्यकारी संचालकांची स्वतंत्र नियुक्ती केली जाणार अाहे. या संचालकांना दिल्या जाणाऱ्या अधिकारांची मर्यादाही वाढविण्यात येणार अाहे.
उत्तर महाराष्ट्रावर अन्याय
विभाजनालासर्वच स्तरांतून विरोध होत असतानासुद्धा शासनाने प्रशासनाने वीज वितरण कंपनीचे वेगवेगळे चार विभागीय कार्यालयांमध्ये स्थापन करण्याचे निश्चित आहे. राज्यात इतर सर्व िवभाग सोईस्कररीत्या तयार केले असून, उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला असल्याचे महावितरणमधील अभियंत्यांचे म्हणणे आहे. पूर्वीपासून {उर्वरित. पान

अाता औरंगाबादला जावे लागणार
विभाजनाचा निर्णय जाहीर आहे. त्यादृष्टीने विभाजनाची तयारी सुरू आहे. औरंगाबाद विभागाशी जोडल्याने आता मुंबईऐवजी औरंगाबादला जावे लागेल. तेथे नवीन कार्यालयाची उभारणी होऊन वरिष्ठ पदेही नियुक्त केली जातील. १५ ऑगस्टपासून यास सुरुवातीचे संकेत दिले जात आहेत. जे.एम.पारधी,मुख्य अभियंता, महावितरण

हा होईल फायदा
यापूर्वीमहावितरणचे परिमंडळ मुंबईला असल्याने अधिकाऱ्यांना कामासाठी ४५० किलाेमीटर दूर जावे लागत हाेते. अाता अाैरंगाबादला परिमंडळ जाेडले गेल्याने हे अंतर १५० किलोमीटरवर येईल. विभाजनामुळे विभागीय संचालकांना जास्त अधिकार मिळून त्याचा फायदा विभागाला होऊ शकणार आहे. वीज आयोगाकडील तक्रारींबाबतची सुनावणी मुंबईऐवजी औरंगाबादेत होईल. नागपूर, कल्याण, पुणेनंतर आता विभागीय कार्यालयांमुळे कामांची गती वाढेल.

हा होईल तोटा
थकबाकीगळतीमध्ये मराठवाड्याचे प्रमाण जळगावपेक्षा अधिक आहे. यामुळे जळगाव विभागाचे नाव खराब होईल. पायाभूत आराखड्यानुसार वीजहानी असलेल्या विभागामुळे निधीवर परिणाम होण्याची भीती वाढेल. परिमंडळ नाशिक, मुंबईशी लोकभावना जुळलेल्या असल्याने मराठवाड्यामुळे जिल्ह्यात भारनियमनही वाढण्याची भीती आहे. तांत्रिक हानी कमी असलेल्या जळगाव परिमंडळाचा परफॉर्मन्स खराब दिसेल संकटांना सामोरे जावे लागेल.
जळगावची खासबातमी
बातम्या आणखी आहेत...