आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस उभारणीसाठी ‘जळगाव पॅटर्न’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात पक्षात आलेली मरगळ दूर करून पक्षाचा जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच आगामी निवडणुकांमधून पक्षाचे स्थान उंचावण्यात यावे, असा संकल्प शनिवारी लेवा भवनात झालेल्या जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, पक्षनिष्ठा नसलेल्या पदे घेऊन पक्षाची कामे करणाऱ्यांना राम राम करू, असा दमही प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशाेक चव्हाण यांनी दिला. प्रदेशाध्यक्षांसह तीन अामदार पक्ष कार्यकारिणीची फळी प्रबाेधनासाठी अाली हाेती. काॅंग्रेसला उभारी देण्यासाठी राज्यभरात जळगाव पॅटर्न राबवणार, अशी घाेषणा चव्हाण यांनी केली.

पक्षाच्या आजवर झालेल्या मेळाव्यात राहिलेली गोंधळाची परंपरा या शिबिराने मोडीत काढली. सात तास चाललेल्या शिबिरात दीड हजारांवर कार्यकर्ते सहभागी होते. शिबिराची सूत्रे आमदार भाई जगताप यांनी सांभाळल्याने नेहमीचा गोंधळ दिसून अाला नाही. सुरू असलेल्या कार्यक्रमात निवेदने देणाऱ्यांना रोखण्यात मात्र पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, भाई जगताप, आमदार अब्दुल सत्तार, आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रभारी शोभा बच्छाव, हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, पुष्पा तायडे, अॅड.ललिता पाटील, उदयसिंग पाटील, अॅड.सलीम पटेल उपस्थित होते.

लोकसभा, विधानसभेतील अपयशानंतर पक्षाने राज्यात पुन्हा पक्ष संघटनेचे नियोजन केले आहे. संघटनात्मक पातळीवर अपयशी ठरलेल्या जिल्ह्यामध्ये बदल घडवण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण राबवण्यात येत आहे. याची यशस्वी सुरुवात जळगावातून झाली अाहे. आमदार जगताप, प्रभारी बच्छाव, हेमलता पाटील, रवी शर्मा यांनी दोन महिन्यात पक्षांतर्गत अनेक बदलही घडवून आणले आहेत, असेही त्यांनी सांगितले. वर्षांत बदल दाखवणार : चव्हाण : जिल्ह्यातपक्षाची खुंटलेली वाढ उदासीनता रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जाणून ती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. भाजपकडून होणाऱ्या विविध घोषणा, मात्र त्याची होत नसलेली अंमलबजावणी, यातून जनतेची होणारी फसवणूक जनतेसमोर आणण्याचे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करायचे आहे. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठीचे नियोजन केले असून, यात जळगाव जिल्ह्यावर अधिक लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये क्षमता असून पक्षाला विधायक वातावरणही आहे. पुनर्बांधणीत कमी पडत असलेल्या तालुक्यात काही बदल करून बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचे नियोजनही केले अाहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन जिद्दीने काम केल्यास तीन वर्षांत पक्ष आपले स्थान पुन्हा उंचावेल, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

गांधीवादातून काँग्रेसची मांडणी
उद्घाटनानंतरझालेल्या प्रबोधन सत्रात ज्येष्ठ लेखक पत्रकार निरंजन टकले यांनी गांधीजी, नेहरू आणि सावरकर या विषयावर प्रबोधन केले. गांधीजींचे विचार, त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेली चळवळ त्या चळवळीला आलेले यश, याविषयी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाने ६० वर्षांत काय दिले, यासह वर्षांत नवसरकारने काय दिले याचे विश्लेषणही त्यांनी मांडले.

पाणलोटक्षेत्र गेले हाताबाहेर : जलअभ्यासक अण्णा बोराडे यांनी पाणलोट क्षेत्रातील देशातील परिस्थितीचे चित्रण त्यात सरकारचे धोरण, याबाबत विश्लेषण केले. पाणलोट क्षेत्रातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांना काही करण्याची इच्छा होत नाही. निसर्ग साथीला नसताना या परिस्थितीतून मार्ग शेतकऱ्यांना काढावा लागत आहे. पाणलोट क्षेत्र आवश्यक आहे. मात्र, हवामान बदलाचे आरिष्ट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आहे. सेंद्रीय शेती, रेशीम उद्योगासारखे पर्याय उपलब्ध असून याचा विचार होणे गरजेचे असल्याचेही बाेराडे यांनी सांगितले.

कायद्यातबदल झाले पाहिजे : देशातजो विरोध करेल तो देशद्रोही आहे, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी "राष्ट्रभक्ती देशद्रोह' या विषयावर बोलताना दिली. निवडणुकांदरम्यान पहिला हल्ला हा तरुण मतदारांवर झाला आहे. यामुळे मुलांना सांभाळणे हे देशापुढे आव्हान बनले आहे. तरुण पिढी चुकीच्या मार्गाने जात असेल तर ते देशाला परवडणारे नाही. देशभक्ती देशद्रोहाच्या मुळाशी तरुण आहे. तरुणांना योग्य कामाची संधी मिळत नसेल तर कायद्यात बदल झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गर्दीसाठीमहाविद्यालयीन विद्यार्थी : कार्यकर्ताशिबिरात पहिल्या सत्रापर्यंत गर्दीचा उच्चांक होता. यात महिला, कार्यकर्त्यांसह वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अधिक सहभागी होते. सभागृहातील संख्या वाढवण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेशही केल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बसेसचीही व्यवस्था होती. उद‌्घाटनानंतर मात्र शोधूनही विद्यार्थी सापडले नाहीत. काँग्रेसप्रणीत संघटनेचे हे विद्यार्थी असल्याचा खुलासा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

जगन साेनवणे यांची समजूत काढताना अॅड. संदीप पाटील उल्हास पाटील.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सत्कारासाठी व्यासपीठावर जात असताना आमदार भाई जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. समजूत घालत त्यांना व्यासपीठावर बसवले. मात्र, मनात राग असल्याने वक्त्यांचे भाषण सुरू असतानाच त्यांनी आधी सत्काराचा आग्रह धरला. व्यासपीठावरूनच मित्र पक्षास योग्य वागणूक देत नसल्याचा राग व्यक्त करून "आमदार भाई जगताप मुर्दाबाद' अशी घोषणा देत बाहेर पडले सत्काराचे हारही तोडून फेकले. या वेळी हे कार्यकर्ता शिबिर आहे. यात आपण कोणत्याही मित्र पक्षास आमंत्रित केले नसल्याचा खुलासा करीत पक्षाला फुलहारांची नव्हे, विचारांची गरज असल्याचा खुलासा जगताप यांनी दिला.
भाजपने खाेटी अाश्वासने देऊन भास निर्माण केला
उद्घाटनावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशात सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेत प्रचंड असंतोष आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना खोटी आश्वासने देऊन भास निर्माण केला जात आहे. मात्र, भाजपचा बनवाबनवीचा हा कार्यक्रम जनतेच्या लक्षात आला आहे. सत्तेचा उन्माद अाल्याने त्यांनी विचार लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, वातावरण बदलते आहे. शासन काँग्रेसचा एकही निर्णय बदलू शकले नाही, हाच पक्षाचा विजय आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपले असून, नथुराम गोडसेंच्या प्रोत्साहनाचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले.

हा आहे जळगाव पॅटर्न
पक्षातील गटबाजी माेडून काढत कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यासाठी अामदार भाई जगताप यांच्यासह समितीने गेल्या वर्षभरापासून जळगाववर लक्ष केंद्रित केले अाहे. विराेधी पक्षात राहून पक्षाला उभे करण्यासाठी, कार्यकर्त्यांना प्राेत्साहन देण्यासाठी विविध विषयांचा समावेश असलेल्या शिबिराचे अायाेजन केले. जळगावपासून या शिबिरांची सुरुवात झाली असून पक्षबांधणीच्या या प्रक्रियेला कांॅग्रेसने ‘जळगाव पॅटर्न’ असे नाव िदले अाहे. सर्वच जिल्ह्यांत हा पॅटर्न राबवला जाणार अाहे.

काॅंग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता कार्यशाळेला विद्यार्थिनींना बाेलावण्यात अाले हाेते. मात्र, नेत्यांचे भाषण डाेक्यावरून जात असल्याने काही मुली अक्षरश: झाेपी गेल्या, तर काही माेबाइल खेळण्यात गर्क हाेत्या.