आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इमेल’, ‘व्हाट्स अॅप ’वर फिर्यादीची प्रत मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस ठाणे ते पोलिस अायुक्तालय कारभार अाता अाॅनलाइन झाला अाहे. सीसीटीएनएस या तंत्रज्ञानाचा अवलंब करत थेट संगणकावरच फिर्याद नोंदवून घेतली जात अाहे. पोलिस ठाण्यातील डायरीची पद्धत अात बंद झाली अाहे. अामची तक्रार घेतली जात नाही. फिर्यादी काॅपी मिळत नाही अशी तक्रार नागरिकांची असत. अाॅनलाइन तक्रार देण्याची सोय झाली अाहे. अाता त्याहून पुढे जात जर अापण फिर्याद देताना मेल अायडी, व्हाॅटस्अप नंबर दिल्यास अापल्याला त्यावर काॅपी देण्याची सोय अाहे. समजा काही तांत्रिक कारणांमुळे काॅपी मिळत नसेल तर मोबाइल कॅमेराव्दारे फोटो काढून घेऊ शकता. अशी सोय अाता सातही पोलिस ठाण्यांत झाली. नागरिकांच्या दृष्टीने ते खूपच सोयीचे झाले. काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक कार्यालयानेही नागरिकांना फिर्याद काॅपीचा फोटो घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात अाल्या अाहे.
डायरीतलिहिण्याची जुनी पद्धत बंद
पूर्वीपोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार अापली तक्रार डायरीत नोंदवून घेत. ती डायरीच ग्राह्या धरली जायची. ही पद्धत अाता बंद झाली अाहे. प्रत्येक ठाण्यात, चौकीत संगणक संच अाहेत. त्यावर थेट अापली फिर्याद नोंदवून घेतली जाते. एखादी घटना घडली अथवा उशिरा नोंद घेण्यात अाली तर वरिष्ठ अधिकारी उशिराचे कारण विचारू शकतात. अाॅनलाइन तक्रार अथवा अापण दिलेली फिर्याद संगणकावर नोंदल्यानंतर कुठलाही अधिकारी थेट काॅपी पाहू शकतो. घटनेच्या तपासाबाबत माहिती विचारू शकतो.
अामचेही प्राधान्य अाहेच : अामच्याकडेतक्रार देण्यास अाल्यानंतर गुन्हा नोंदल्यानंतर लगेच काॅपी देतो. गरज असल्यास मेल, व्हाॅटसप अथवा फोटो काॅपी देतोच. सोलापुरात सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीस ते पंचवीस गुन्हे सरासरी रोज दाखल होतात. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अाैरंगाबाद या मोठ्या शहरांत मोबाइलवर मेसेज, व्हाॅटस्, मेलव्दारे काॅपी देण्यात येते. अापल्याकडे कोण मागणी केल्यास देतो. ही योजना चांगली असून पेपरलेस काम अाहे. नागरिकांना कुठेही माहिती पाहता येते, असे फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.
लगेच माहिती घेता येते
फिर्यादीचीकाॅपी फिर्यादीकडून अापणला पाहण्यास मिळाली तर त्यावर अभ्यास करून मत मांडता येते. जलदगतीने माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. पूर्वी फिर्यादी काॅपी मिळायला उशिरा लागत होता. अाता मोबाइल, मेलमुले जलदगतीने काम होऊ शकते, असे मत अॅड. अमित अाळंगे यांचे अाहे.
तत्काळ कापी
अाता सगळ्या तक्रारी संगणकावरच नोंदवून घेतल्या जातात. फिर्यादी काॅपीवर तक्रारदाराचा अधिकार अाहे. त्यांना ती काॅपी दिलीच पाहिजे. मेल, व्हाटसअपवर माहिती देण्याच्या सूचना अाहेत. शिवाय काही तांत्रिक कारणांमुळे मेल करता येत नाही. त्यावेळी अापण मोबाइलवर फोटो काॅपी घेऊ शकतो. तसेच झेराॅक्स प्रत तरी दिली जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच फिर्याद काॅपीची मागणी करावी. पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त