आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Small Traders Also Send Goods By Railway Wagon

आता छोट्या व्यापाऱ्यांनादेखील मालगाडीने पाठवता येईल माल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोठ्या व्यापाऱ्यांप्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांनाही अाता देशाच्या कानाकोपऱ्यांत कुठेही रेल्वे मालगाडीने त्यांचा माल सहज पाठवता येणार अाहे. त्यासाठी संपूर्ण मालगाडी बुक करण्याची गरज नाही. असा अभिनव निर्णय भुसावळ मध्य रेल्वे विभागाने घेतला अाहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना ३१ मेपर्यंत बुकिंग करावी लागणार अाहे.

अातापर्यंत रेल्वेने माल पाठवणे केवळ मोठ्या व्यापाऱ्यांच्या आवाक्यातली बाब होती. आता छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यापार वृद्धिसाठी भुसावळ मध्य रेल्वे विभागाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. मालगाडीच्या एका वॅगनमध्ये ६४ टन माल पाठवता येणार अाहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी ३१ मेपर्यंत बुक केल्यास तो त्यांना कोणत्याही ठिकाणी पाठवता येईल. यासाठी संपूर्ण मालगाडी बुक करण्याची आवश्यकता भासणार नाही. रेल्वे सेवेशी लहान व्यावसायिक जोडले जावे, हा रेल्वे प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. तसेच उत्पन्नवाढीसाठी रिकाम्या जागांवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुलनिर्मिती करण्याचेही रेल्वेने ठरवले आहे.

जंक्शन स्थानकावर सुविधा
भुसावळ मध्य रेल्वे विभागातील मुख्य रेल्वेस्थानकावर माल पाठवण्यासंदर्भात बुकिंग केली जाणार अाहे. तसेच जंक्शन असलेल्या रेल्वेस्थानकावरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे. या साेयीचा छाेट्या व्यापाऱ्यांना माेठा दिलासा मिळाला अाहे.

निर्णयाचा ग्राहकांनादेखील फायदा
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या नेतृत्वात रेल्वे प्रशासन चांगले काम करीत आहे. छोट्या व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत माल मिळेल. महागाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल. रेल्वे प्रशासनाने आता सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर. डी. जैन, संस्थापकअध्यक्ष, यंग आंत्रप्रोन्योर असोसिएशन