आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्य क्रमांक गुन्ह्यासाठी अाता ई-मेल, जीअारपीच्या नागपूर विभागाकडून वापर सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शून्य क्रमांकाने दाखल गुन्हे तातडीने वर्ग करण्यासाठी लाेहमार्ग (जीअारपी) पाेलिसांनी ई-मेलचा वापर सुरू केला अाहे. नागपूर विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी पुढाकार घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली अाहे.

एखाद्या लाेहमार्ग पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडलेला नसताना ताे जर दाखल झाला, तर शून्य क्रमांकाने ताे वर्ग करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागायचा. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने नागपूर लाेहमार्ग पाेलिस विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी विभागातील १६ पाेलिस ठाण्यांतील शून्य क्रमांकाने दाखल गुन्हे त्याच दिवशी ई-मेलद्वारे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या अाहेत. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली अाहे.
विभागातून धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या भुसावळात थांबतात. रेल्वेत सामानाची चाेरी झाली अथवा हाणामारी घडली, तर गाडी थांबल्यावर भुसावळात गुन्हा दाखल केला जाताे. मात्र, ताे जर इटारसी हद्दीत गुन्हा घडला असेल, तर ताे वर्ग करण्यासाठी गुन्ह्याची कागदपत्रे नागपूर पाेलिस अधीक्षकांकडे पाठवली जातात. तेथून ती भाेपाळ जीअारपीकडे पुन्हा इटारसी जीअारपीकडे जातात. या प्रक्रियेत २२ ते २८ दिवसांचा कालावधी लागताे. मात्र, अाता गुन्हे वर्ग करण्यासाठी ई-मेलचा वापर हाेत असल्याने वेळेची बचत झाली अाहे.

१०पाेलिस अधीक्षकांना ई-मेल
भाेपाळ,जबलपूर, सिकंदराबाद, पुणे, मुंबई, मुंबई वेस्टर्न, बडाेदा झाशी येथील जीअारपी पाेलिस अधीक्षकांना नागपूर विभागातील जीअारपी पाेलिस ठाण्यांचे ई-मेल अायडी देण्यात अाले अाहेत. या सेवेच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अादान-प्रदान व्हावे, असे सूचित करण्यात अाले अाहे.

गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार
गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून ज्या दिवशी अशा प्रकारचा गुन्हा दाखल हाेईल, ताे त्याच दिवशी ई-मेलने वर्ग करण्याचे सर्व पाेलिस ठाण्यांना सूचित केले अाहे. - राजीव जैन, पाेलिस अधीक्षक, जीअारपी, नागपूर