आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बेशिस्त वाहनचालकांनाच फिरावे लागेल पोलिसांच्या मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बेशिस्त वाहन पार्किंग असेल तर पोलिसांना एक तर वाहन उचलून जमा करावे लागायचे किंवा चालकाला गाठून कारवाई करावी लागे. यात चालकाऐवजी पोलिसांनाच त्रास सहन करावा लागे. आता या त्रासापासून सुटका करणारे ‘ज्ॉमर’ नावाचे नवे अस्त्र पोलिसांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे पोलिसांना नव्हे तर बेशिस्त चालकांनाच पोलिसांच्या मागे फिरावे लागेल.

शहर वाहतूक शाखा अत्याधुनिक करण्यासाठी व शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. वाहतूक शाखेला नियोजन मंडळाकडून मिळालेल्या 20 लाखांच्या निधीतून पोलिसांनी वाहनांना लावण्यासाठी 80 जॅमर खरेदी केले आहेत.

80 जॅमर दाखल होणार
वीस लाखांच्या निधीतून वाहतूक शाखेने 80 जॅमर खरेदी केले आहेत. या जॅमरमुळे पोलिसांचे काम सोपे होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही जॅमर पोलिसांना प्राप्त झाले आहेत. यात चारचाकी वाहनाबरोबर दुचाकी वाहनांना लावण्यात येणार्‍या जॅमरचाही समावेश आहे.
काय आहेत जॅमर?
जॅमर म्हणजे वाहनाचे चाक जाम करण्याचे यंत्र. मग ते कोणतेही वाहन असो. लोखंडी रॉडच्या साहाय्याने गोलाकार रिंगप्रमाणे हे जॅमर असणार आहे. त्याला एका ठिकाणी लॉक लावण्यासाठी जागा आहे. हे जॅमर वाहनाच्या चाकात लॉक केल्यानंतर ते वाहन पुढे किंवा मागे जाऊच शकत नाही.
मोठय़ा शहरांमध्ये होतो वापर
जॅमरचा वापर मोठय़ा कॉर्पोरेट शहरांमध्ये करण्यात येतो. ज्या शहरांमध्ये रस्त्यावर धावणार्‍या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे, अशा शहरांमध्ये वाहनांना हे जॅमर लावण्यात येतात, जेणेकरून पोलिसांचे र्शम वाचतात व वाहने लिप्ट करून नेण्याची आवश्यकता भासत नाही.
काय फायदा होणार?
एखादे वाहन नो पार्किं गमध्ये उभे असेल किंवा वाहतुकीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी उभे असल्यास या वाहनाला पोलिसांना लिफ्ट करून वाहतूक शाखेत आणावे लागते; अन्यथा त्या वाहनाचा चालक त्याचे काम आटोपून वाहन घेण्यासाठी परत येतो तोपर्यंत वाहतूक पोलिसांना त्याच ठिकाणी थांबून राहावे लागते. जॅमरमुळे पोलिसांना वाहनाजवळ थांबण्याची गरज भासणार नाही. वाहनाचे चाक जॅमर लावले की, त्याची चावी वाहतूक पोलिसाकडे असेल. त्यामुळे वाहन सांभाळण्याची आवश्यकता नाही. वाहनचालक आल्यानंतर त्या वाहनावर वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी लावलेली चिठ्ठी पाहील व त्यानंतर जवळपास असलेल्या वाहतूक कर्मचार्‍याला शोधून दंड भरून मोकळा होईल.
कॅमेरेही लावणार
आकाशवाणी चौक ते बसस्थानक या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍यांमुळे रस्त्यावर अपघात करून पळून गेलेले वाहन ओळखण्यास मदत होणार आहे. साधारणत: 200 मीटर अंतरापर्यंतचे सर्व चित्रीकरण या कॅमेर्‍यात चित्रित होणार आहे. जीपीआरएस सिस्टीमचा वापर या कॅमेर्‍यांसाठी करण्यात आला आहे.