आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तुमचा मोबाइलच सांगेल नंबर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तुम्ही जर नवीन सिम घेतले असेल अन् त्याचा नंबर तुम्हाला माहीत किंवा आठवत नसेल तर त्यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. कारण सर्व्हिस प्रोव्हाइडर्स कंपन्यांनी एक फीचर बाजारात आणले आहे. कंपनीनुसार त्यात आकडे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर सहज जाणून घेता येणार आहे.


कॉलेजकुमार देवेशने नुकतेच एक नवे सिम घेतले होते. ज्या वेळी मित्रांनी त्याला त्याचा नवीन मोबाइल नंबर विचारला, त्या वेळी तो नंबर चटकन आठवत नसल्याने देवेश खजील झाला. तसेच राजेशलाही घरात मोबाइल कव्हरेजची समस्या होती. म्हणून त्यानेही नवीन सिम घेतले. याबाबत त्याने आॅफिसच्या मीटिंगमध्ये आपल्या सहका-यांशी हा विषय शेअरदेखील केला. त्या वेळी सर्वांनीच त्याला नवीन नंबर मागितला; मात्र राजेशला प्रयत्न करूनही नवीन सिमचा नंबर आठवत नव्हता. त्यामुळे त्याने नवीन नंबरवरून त्याच्या मित्राला फोन केला. त्यानंतर त्या मित्राने नंबर सांगितल्यावर तो त्याने त्याच्या सहका-यांना दिला. तसे पाहिले तर महाविद्यालयीन युवकांसाठी फोन नंबर बदलणे आणि नवीन सिम घेणे आता सामान्य बाब झाली आहे.


अनेकांची डोकेदुखी
नवीन सिम घेतल्यानंतर बहुतांश ग्राहकांना नंबर न आठवण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक सीम बाळगणा-यांना 10 अंकी क्रमांक लक्षात राहत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी मोबाइल सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्यांनी नुकत्याच काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. या सेवांचा उपयोग करून मोबाइलधारक आता सहजपणे आपला मोबाइल नंबर शोधू शकणार आहेत. काही कंपन्या आधीपासूनच ही सुविधा देत आहेत; मात्र पुरेशा माहितीच्या अभावामुळे मोबाइलधारक त्याचा वापर करू शकत नसल्याची स्थिती आहे.


या आकड्यांना करा टाइप
वोडाफोन : *111*2 # टाटा-डोकोमो : *580#
एअरटेल : *121*9# रिलायन्स : *1#
आयडिया : *100#,*1# युनिनॉर : *1#
टीप : मोबाइलवरून वरील आकडे टाइप केल्यानंतर ओके बटन दाबणे आवश्यक आहे.