आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचार्‍यांना परीक्षेच्या नावाने गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ‘एनआरएचएम’अंतर्गत ‘एएनएम’ म्हणून कार्यरत असलेल्या साक्री तालुक्यातील कंत्राटी महिला कर्मचार्‍यांना ‘बेसलाइन अँसेसमेंट’ परीक्षेसंदर्भात चुकीची आश्वासने देऊन त्यांची आर्थिक लूट केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अँड. चंद्रकांत येशीराव यांनी केली आहे.

साक्री तालुक्यात कार्यरत असलेल्या 40 कंत्राटी ‘एएनएम’ यांची ‘बेसलाइन अँसेसमेंट’ नावाची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करण्यात येईल, असे आमिष दाखवून प्रत्येकी 12 हजार रुपयांप्रमाणे 48 लाख रुपये जमा करण्यात आले. तसेच जे ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना पदावरून कमी करण्यात येईल, अशी धमकीदेखील देण्यात आली. त्यामुळे भीतीपोटी सर्व 40 ‘एएनएम’ यांनी प्रत्येकी 12 हजार रुपये असे एकूण 48 लाख रुपये तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे जमा केले.

हे पैसे जमा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रोहन थोरात व माता-बालसंगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी दबाव टाकला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व गायत्री सोशल अँण्ड वेल्फेअर संस्थेचे अँड.चंद्रकांत येशीराव यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे अँड.येशीराव यांनी संबंधित दोघा अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच फसवणूक झालेल्या सर्व 40 ‘एएनएम’ यांचा इनकॅमेरा जाबजबाब घेण्यात यावा, अशी मागणीदेखील केलेली आहे. या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील या प्रकरणाबाबत चुकीची तक्रार देण्यात आली आहे. ही पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने कायम करण्याचा प्रo्नच येत नाही. या भरतीप्रक्रियेसाठी जिल्हास्तरीय निवड समिती होती. त्यात डॉ.थोरात यांचा समावेश होत नाही. तसेच नापास वा पास होण्याचा प्रo्नही येत नाही. त्यामुळे ही तक्रार निराधार आहे. डॉ.संतोष नवले, माता-बालसंगोपन अधिकारी