आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआरएमयू पदाधिकारी निवडीसाठी झाले मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळात तब्बल एक तपानंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे चार दिवसीय वार्षिक अधिवेशन घेण्यात आले. समारोपसत्रात बुधवारी रात्री 11.30 वाजता पदाधिकारी निवडीची प्रक्रिया प्रचंड चुरशीत पार पडली. 20 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. भुसावळसह पाच विभागातील 340 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीत महामंत्रिपदी एस. के. बोस यांचा पराभव करून वेणू पी. नायर हे विजयी झाले. सहायक महामंत्रिपदाच्या चार जागांसाठी सहा उमेदवारांमध्ये तूल्यबळ लढत झाली. त्यात डी. रमेशबाबू, नितीन प्रधान, पी. टी. एस. राजा, त्रिभुवन सिंह यांनी विजय मिळवला. मुंबई मंडल सचिवपदी वेणू पी. नायर, पुणे मंडल सचिवपदी सुनील बाजारे, झोनल सचिवपदी पी. उमापती, कार्याध्यक्षपदी अरुण बी. मनोरे, पी. आर. मेमन, मुंबई मंडल उपाध्यक्षपदी आर. के. मलबारी, पुणे मंडल उपाध्यक्षपदी मल्लीनाथ भीमाशंकर यांनी विजय मिळवला. कार्यकारिणी सदस्यपदाच्या 8 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते. त्यात प्रदीपकुमार पी, राजेश थोरात, रमेश बी. भोईर, आर. के. मलबारी, संभाजी एन. म्हात्रे, शंकर जी. पगारे, सुभाष एस. पाटील हे विजयी झाले.

पाटणा अधिवेशनाकडे लक्ष
एनआरएमयू फेडरेशनचे अधिवेशन पटण्यात होणार आहे. या अधिवेशनाला भुसावळ विभागाचे पदाधिकारी उपस्थिती देणार आहेत. भुसावळात झालेले अधिवेशन यशस्वी झाले आहे. अरुण धांडे, सचिव, लाइन शाखा

कर्मचार्‍यांना न्याय मिळेल
एनआरएमयूच्या अधिवेशनाला पाचही विभागातील कर्मचार्‍यांची प्रचंड उपस्थिती लाभली. युनियनच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा सहवास लाभला. चांगले विचार ऐकण्यास मिळाले. पदाधिकारी निवड शांततेत झाली आहे. रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्या सुटून न्याय मिळेल. आर. के. भोरटक्के, खजिनदार, प्रशासन शाखा

पाच विभागांचे पदाधिकारी
मुंबई, सोलापूर, पुणे, नागपूर, भुसावळ या पाच विभागातून 18 हजार पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वेतील ठेकेदारी बंद करावी, संघटन मजबूत करणे, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, रिक्त जागांची भरती करावी, यासह 10 प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. आता फेडरेशनचे अधिवेशन 22 ते 24 नोव्हेंबरला पाटण्यात होणार आहे.

अधिवेशन खेळीमेळीत
रेल्वे कर्मचार्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कटिबद्ध आहे. अधिवेशनात 10 प्रस्तावांवर चर्चा झाली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात अधिवेशन पार पडले. इब्राहिम खान, मंडळ सचिव, भुसावळ