आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर आरक्षणासाठी मंत्र्यांच्या पुतळ्यांचे दहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागणीला मधुकर पिचड व वसंत पुरके हे सातत्याने विरोध करीत असल्याच्या कारणावरून राज्य धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेतर्फे शनिवारी दुपारी 4 वाजता स्वातंत्र्य चौकात आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड व माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

धनगर समाज अनुसूचित जमातीत असल्याचे अनेक पुरावे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीत धनगर समजाच्या अनुसूचित जमातीत समावेशाबाबत निर्णय घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी दाखवली होती. त्या वेळी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी विरोध करून होणार्‍या ठरावास अडचण निर्माण केली. त्यावरून कॅबिनेट बैठकीत खडाजंगीही झाली. याचा राग व्यक्त करीत याविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात प्रदेश महासचिव सुभाष सोनवणे, मल्हारसेना जिल्हाध्यक्ष संदीप तेले, माजी जिल्हाध्यक्ष अरुण ठाकरे, सुभाष करे यांनी नेतृत्व केले.