आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nursery Schools Admission 'Close' Issue At Jalgaon

जळगावमध्‍ये नर्सरी शाळांचे प्रवेश ‘क्लोज’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील प्रमुख इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पूर्व प्राथमिक वर्गासाठीचे (नर्सरी) प्रवेश एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ‘क्लोज’ झाले आहेत. त्यामुळे आता पाल्याच्या प्रवेशासाठी विवेकानंद प्रतिष्ठानसह अन्य काही मोजक्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा पर्याय पालकांसमोर उरला आहे.

30न्यू इंग्लिश स्कूल
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच प्रवेशासाठी पालकांकडून विचारपूस केली जाते. त्यामुळे शहरातील काही प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी अक्षरश: झुंबड उडते. यंदाही केसीई सोसायटीची ओरियन, उज्‍जवल स्पाउटर, कनोसा कॉन्व्हेंट या शाळांमध्ये एका जागेसाठी तीन अर्ज याप्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेचे अपेक्षित शुल्क भरण्याची तयारी असणार्‍या पालकांच्या पाल्यांनाही या शाळांमध्ये प्रवेश मिळालेला नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अनेक शाळांमध्ये ‘अँडमिशन क्लोज’चे फलक लागल्याचे दिसून आले.

मोजक्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा पर्याय शिल्लक
नर्सरीसाठी प्रवेश प्रकिया मार्चपासून सुरू असून प्रवेश पूर्ण झाले आहेत. 80-85 जागांसाठी 750 अर्ज आले होते. एवढय़ा मोठय़ा संख्येतून विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया पार पाडणे जिकिरीचे ठरले आहे. - सुषमा कंची, प्रिन्सिपल, ओरियन सीबीएसई

नर्सरीचे प्रवेश पूर्ण असून पहिलीसाठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. यातून रिक्त होणार्‍या जागांवर गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मानसी भदादे, प्रिन्सिपल, उज्‍जवल स्पाउटर

जानेवारी महिन्यात यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानुसार मार्चमध्येच ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयसीएससी अंतर्गत ही प्रक्रिया पार पडली आहे. - सिस्टर सारुपिया, प्रिन्सिपल, सेंट टेरेसा


जानेवारीतच प्रक्रिया
सेंट टेरेसा, रुस्तमजी, सेंट जोसेफसह अन्य मिशनरी शाळांमध्ये जानेवारीतच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे. एप्रिलमध्ये इतर काही संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोदावरी इंग्लिश मीडियम, विवेकानंद प्रतिष्ठान, रोझलॅण्ड, प्रोग्रेसिव्ह, वर्धमान यासह अन्य मोजक्याच संस्थांच्या शाळांमध्ये अद्यापही प्रवेश देणे सुरू असल्याने पालकांसमोर या शाळांचाच पर्याय उरला आहे.