आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nutan Maratha College, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविद्यालयामुळेच आमच्या पंखांना बळ, ‘नूतन मराठा’च्या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हल्लीवेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या नूतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा जुन्या आठवणी आणि महाविद्यालयातील प्रसंगांनी रंगला. महाविद्यालयामुळेच आमच्या पंखांना बळ मिळाले असा सूर माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतातून उमटला नूतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा रविवारी झाला.
महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. अजय साळी हे अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी असलेले माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, कवयत्री अस्मिता गुरव, डॉ. एस.एस. राणे, प्रा. बी.डी. पाटील प्रमुख पाहुणे होते. माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत महाविद्यालयाशी आपले संबंध शिक्षणाचा क्रम परिचयातून सादर केला. प्राचार्य एल.पी. देखमुख यांनी प्रास्तविक केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
शेतक-यांच्या मुलांना सामावले
शशिकांत हिंगोणेकर म्हणाले, नूतन मराठा महाविद्यालय हे गरीब, कष्टकरी शेतकरी मुलांना सामावून घेणारे तसेच बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. माय-बाप अशी पदवी या महाविद्यालयाला दिली जाते. कवयत्री गुरव म्हणाल्या, माझ्या जीवनात कवितेचे साहित्याचे बळ या महाविद्यालयाने दिले. शंभू पाटील यांनी जीवनात जे घडलो ते महाविद्यालयामुळेच, असे सांगितले. अॅड. माधव भोकरीकर म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात विविध वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाल्यामुळेच उच्च न्यायालयात वकील होऊ शकलो. रिसर्च ऑफिसर राकेश पाटील म्हणाले, या पदापर्यंत पोहोचण्याचे संपूर्ण श्रेय महाविद्यालयाला जाते. या वेळी रवी जोशी, रजिया खान, प्रशांत बाविस्कर, श्रीकांत विधाते, प्रा. गायत्री खडके, डीवायएसपी संजय पाटील असे विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. अमेरिकेत वैज्ञानिक असलेले डॉ. दस्तगीर शेख यांनी एसएमएसद्वारे शुभेच्छा दिल्या.