आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमिनीतील 'स्फुरद'चे प्रमाण घटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - कृषीविभागाने तालुक्यातील पाच गावांच्या शिवारातील माती नमुन्यांचे परीक्षण केले आहे. यानुसार प्राप्त अहवालात जमिनीतील स्फुरदाचे प्रमाण खालावत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे जमिनीचा पोत खालावून उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

कृषी विभागातर्फे दरवर्षी शेतीमधील मातीचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. सन २०१४च्या एप्रिल मे महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी प्रतिदहा हेक्टरला एक नमुना याप्रमाणे तालुक्यातील जाेगलखोरी, कन्हाळे बुद्रूक, कन्हाळे खुर्द, भीलमळी मांडवेदिगर येथील मातीचे नमुने परीक्षणासाठी पाठवले होते. त्यात मातीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फूरद, चुनखडी, स्फुरद, सूक्ष्म अन्नद्रव्य आदींची तपासणी करण्यात आली. यामध्ये रासायनिक खतांचा अशास्त्रीय वापर होत असल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात काही वर्षांपासून सोयाबीन, कपाशीच्या पे-यात वाढ झाली आहे.मात्र, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न येत नसल्याची स्थिती आहे. मांडवेदिगर भागातील जमिनीत लोह आणि जस्ताचे प्रमाण कमी आहे. शिवाय रासायनिक गुणधर्मानुसार जमिनीचा सामू-अल्कली, तर प्रमुख अन्नद्रव्यांमध्ये स्फुरदचे प्रमाणही कमी आहे.

सल्फेटचे केले वितरण
अहवालप्राप्त होताच प्रकल्पांतर्गत संबंधित शेतक-यांना झिंक सल्फेट, फिरस सल्फेट जिप्समचे वितरण करण्यात आले. शेतक-यांना मार्गदर्शनदेखील करू. माती निरीक्षणासाठी मांडवेदिगर गावाची प्रामुख्याने निवड झाली होती. श्रीकांतझांबरे, कृषी अधिकारी, भुसावळ