आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी ‘अॅडमिन’ सुधारगृहात, अजिंठा चौफुलीवर वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून मंगळवारी रात्री जमावाने अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको दगडफेक केली होती. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला असून एमअायडीसी पाेलिसांनी ग्रुप अॅडमीनसह एकाला ताब्यात घेतले हाेते. त्यांना दाेघांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता एकाला २४ जूनपर्यंत काेठडी सुनावण्यात अाली तर ग्रुप अॅडमीनला निरीक्षणगृहात पाठविले.

दंगलप्रकरणी पाेलिस हवालदार अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरून लुकमान, रज्जाक, सिकंदर, बाबू चाेट्ट्या, शेख अय्याजोद्दीन जमालाेद्दीन, रऊफ खान, शेख इक्बाल शेख, फैजल शेख, अब्दुल करीम, इम्रान गाेमा मुलतानी यांच्यासह २५ जणांवर दंगलीचा शासकीय कामात अडथळा अाणल्याचा गुन्हा दाखल झाला. तसेच शेख नदीम शेख करीम (रा. कासमवाडी) यांनी व्हाॅट्सअॅपवर अाक्षेपार्ह पाेस्ट टाकल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश राजवानी (वय ३२, रा. राधेश्यामनगर), महेश प्रजापती (रा. अहमदाबाद) एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणी रामेश राजवानी याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांनी २४ जूनपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. तर अल्पवयीन संशयिताची निरीक्षणगृहात रवानगी केली. सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल पाटील यांनी तर संशयितातर्फे अॅड. वाय.जे.पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान बुधवारी सायंकाळी शेख इकबाल शेख सलीम (रा. रझा कॉलनी), मो. इरफान मो. इसाक बागवान (रा.कासमवाडी), अल्तमश खान अयुब खान (रा. मास्टर कॉलनी), मो. साजिद मो. इकबाल पिंजारी (रा. रझा कॉलनी) यांना अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...