Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Objections To Debt Relief Forms In Five Talukas Of Jalgaon District

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कर्जमाफी याद्यांवर आक्षेप

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यां

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 09:53 AM IST

  • जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कर्जमाफी याद्यांवर आक्षेप
जळगाव- जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे जिल्हाभरात चावडी वाचन सुरू आहे. त्यामध्ये पाच तालुक्यात कर्जमाफी याद्यांवर ३९६ आक्षेप, हरकती घेण्यात आलेल्या आहेत. त्यांची उपविभागीय समितीकडे सुनावणी झाल्यानंतर या याद्या अंतीम करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील हजार २११ गावांमधील लाख ५४ हजार ७४८ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेे आहेत. आतापर्यंत हजार ४६ गावांमधील लाख ९६ हजार ५५९ थकबाकीदारांबाबत चावडी वाचन पूर्ण केले आहे. तर १०८ गावांमधील ३९ हजार २०३ कर्जदारांचे चावडी वाचन अपूर्ण आहे. चावडी वाचनामध्ये कर्जमाफीबाबत आक्षेप हरकती घेण्यात येत आहेत. संबंधित अर्जदारांनी इतर बँकेसाेबत विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतल्याबाबत खातरजमा करण्यात येते आहे. कर्ज घेतल्याचे आढळून आले त्याबाबत अर्जदारांच्या यादीत उल्लेख केलेला नसल्यास पडताळणी अधिकाऱ्यांकडून अर्जदाराचा कर्ज खाते क्रमांक थकीत रक्कम नमूद करण्यात येत आहे. यादीच्या शेवटच्या पानावर पंचनामा करुन त्यावर पडताळणी अधिकाऱ्यांसह सरपंच प्रतिष्ठित व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात येत आहे.

बोदवडमध्ये सर्वाधिक आक्षेप
आतापर्यंतजिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये कर्जमाफी योजनेच्या याद्यांबाबत आक्षेप सादर करण्यात आले आहेत. बोदवड तालुक्यात सर्वाधिक १५४ आक्षेप घेण्यात आले आहेत. जळगाव तालुक्यात ४१, यावल तालुक्यात ८७, पाचोरा तालुक्यात ८६ एरंडोल तालुक्यात २५ असे एकूण ३९६ आक्षेप कर्जमाफीच्या याद्यांवर घेण्यात आले आहेत.

Next Article

Recommended