आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Odisha Mayurbhanj Collector Rajesh Patil News In Marathi

जळगावच्या सुपुत्राचा ओडिशात मराठीचा डंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- जळगाव जिल्ह्यातील सुपुत्र तथा मयूरभंज (ओडिशा) येथील जिल्हाधिकारी राजेश पाटील यांनी आपल्या कामगिरीचा मराठी मनाला अभिमान वाटेल असा ठसा उमटवला आहे. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे एकही शाळाबाह्य विद्यार्थी नसलेला मयूरभंज हा देशातील एकमेव जिल्हा ठरला आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या कामगिरीबद्दल नुकताच त्यांचा गौरव केला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी व सध्या ओडिशामधील मयूरभंजचे जिल्हािधकारी राजेश पाटील यांनी आदर्श कामगिरीचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या जिल्ह्यात आता एकही शाळाबाह्य विद्यार्थी नाही. यासाठी तेथील प्रशासनाने १ एप्रिलपासून विशेष अभियान हाती घेतले. त्यामुळे तब्बल ३ हजार ४६ शाळाबाह्य मुले आता ज्ञानार्जन करत आहेत.

अतिदुर्गम भागात संपर्क
नव्यानेच शालेय पाठ्यपुस्तकांसोबत गट्टी जमलेल्या ३०४६ चिमुरड्यांमध्ये २१५९ मुलांनी मध्येच शाळा सोडली, ६५ मुले आदिवासी घटकातील, तर १२७ बालकामगार आहेत. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी राबवलेल्या अभियानात "शिक्षा रथ' तयार करून ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात प्रबोधन करण्यात आले.

दररोज घेतला आढावा अभियानाची फलश्रुती म्हणून विद्यार्थी पटसंख्या किती वाढली? याचा दररोजचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षण कक्ष स्थापण्यात आला होता. या कक्षाद्वारे प्राप्त आकडेवारीनुसार सन २०१२-२०१३च्या तुलनेत यंदा पटसंख्येत भरीव वाढ होत ती ६७ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचवली.

मिशन म्हणून पाहावे
६ ते १४ वयोगटातील मुलांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. प्रशासनातील अधिकारी, राजकीय लोकांनी याकडे मिशन म्हणून पाहिल्यास २०२०पर्यंत देशाला महासत्ता बनवता येईल.
- राजेश पाटील,

जिल्हाधिकारी, मयूरभंज (ओडिशा)
प्रेरणादायी काम
जिल्हाधिकारी राजेश पाटील यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार केवळ १०० टक्के पटनोंदणी करणे अपेक्षित नसून ती टिकवून ठेवणे हा उद्देश आहे. -औदुंबर चव्हाण, सल्लागार,
- मीडिया अँड आरटीई, नवी दिल्ली