आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळ राेखण्यासाठी पहाटेपासून असते अधिकाऱ्यांची करडी नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अन्नपदार्थांमध्ये भेसळ केले जाणारे पदार्थ परराज्यांतून अाणतानाच राेखण्यासाठी अन्न अाैषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डाेळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सुरुवात केली अाहे. त्यासाठी बसस्थानक रेल्वेस्थानकावर भल्या पहाटेच अधिकारी कर्मचारी तैनात असतात. वाहनांची तपासणीही या वेळी केली जाते. खवा, रवा मैदा या पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते, असे या विभागाच्या पाहणीत अाढळून अाले अाहे.
सणांच्या काळात मिठाईयुक्त पदार्थांचा सर्वाधिक वापर हाेताे. याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. या काळात मध्य प्रदेश गुजरातमधून बनावट मावा, खवा, मिठाई छुप्या पद्धतीने विक्रीसाठी अाणली जाते. छुप्या पद्धतीने बनावट मावाविक्री अन्न औषध प्रशासनाने उघडकीस आणलेली आहे. दोन दिवसांवर दसरा थोड्याच दिवसांत दिवाळी असल्यामुळे बनावट खाद्यपदार्थांची विक्री नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेऊन अन्न अौषध प्रशासनातर्फे परराज्यांतून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यात येत आहे. याकरिता पहाटे पाच वाजेपासून अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बसस्थानक, रेल्वेस्थानक, संतोषीमाता चौक, झाशी राणी पुतळा परिसरासह ज्या ठिकाणी ट्रॅव्हल्सचे पार्सल उतरविले जातात, त्या ठिकाणी रेकी करण्यावर भर देत आहेत. याकरिता जिल्ह्यात तीन अधिकारी कार्यरत आहेत. आठ दिवसांत तेल, तूप, मावा, खवा यांचे दहा नमुने घेण्यात आले आहेत.

गुन्हा होऊ शकतो दाखल
अन्नसुरक्षा मानके कायदा २००६च्या नियमानुसार अन्नभेसळ गुन्हा आहे. विक्रेत्याने भेसळ केल्याचे सिद्ध झाल्यास यासंदर्भात प्रचलित नियमानुसार फौजदारी स्वरूपाची कारवाईदेखील होऊ शकते. दरम्यान, नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न औषध प्रशासनाने केले आहे.

मोहिमेला प्रारंभ
^अन्नातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली अाहे. शहरासह जिल्ह्यातील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात येत आहेत. नागरिकांनीही सणासुदीच्या कालावधीत सतर्क राहून पदार्थांची खरेदी करावी. खरेदीनंतर बिल घेणेदेखील आवश्यक आहे. -एल.ए.दराडे,सहायक आयुक्त, अाैषध प्रशासन
बातम्या आणखी आहेत...