आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव अाणू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जामनेर येथे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद््घाटन ‘महाराजस्व’ अभियानाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम शासकीय असताना या वेळी भाजपचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाच्या फुलात दीपप्रज्वलन करण्यात आले. याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमच्या पत्रिकेतही माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव खालच्या रांगेत हाेते. त्यामुळे भाजपत वाद झाल्यावर जिल्हाधिकारींनी ही पत्रिका शासकीय प्रोटोकॉलनुसार तयार केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पोलिस, प्रशासकीय अधिकारी सरकारला मॅनेज झालेले आहेत. या अधिकाऱ्यांविरोधात हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, अॅड.सचिन पाटील, परेश कोल्हे उपस्थित होते.

जामनेरात वापरलेले कमळाचे फूल लाल रंगाचे
^कमळ हे भारत देशाचे राष्ट्रीय फूल आहे, या उद्देशाने कमळाचे फूल कार्यक्रमात वापरण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे कमळाचे फूल केशरी रंगाचे आहे. जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमातील फूल लाल रंगाचे होते. -रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...