आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ रोहित्रांमधून चार लाखांचे ऑइल चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - औद्योगिकवसाहतीतील विविध ठिकाणांवर बसवण्यात आलेल्या ११ विद्युत रोहित्रांमधील लाख रुपयांच्या ऑइलची चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी क्रॉम्प्टन कंपनीच्या व्यवस्थापनाने एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात काही ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून त्यामुळे चोरटे हाती लागण्याची शक्यताही वाढली आहे.

औद्योगिक वसाहत परिसरातील २२०० केव्ही सबस्टेशनवरील रोहित्राचा कॉक (कळ) उघडून चोरट्यांनी ऑइलची चोरी केली आहे. एका रोहित्रामध्ये ५० लीटर ऑइल असते. औद्योगिक
वसाहत परिसरातील ११ रोहित्रांमधील जवळपास ५०० लिटर ऑइलची चोरी झाली आहे. रोहित्राचा कॉक उघडून नळीद्वारे मोठ्या ड्रममध्ये ऑइल काढून चोरी करण्यात आली असल्याचा संशयही कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री एकाच वेळी ही ऑइल चोरी झाल्याने याविषयी साशंकताही व्यक्त केली जात आहे. एकाचवेळी रोहित्रांमधील ऑइल काढल्याने विजेचा दाब वाढून परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम करत असताना ही गोष्ट उघड झाली. यानंतर शहर अभियंता प्रशांत अनपन यांनी
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी या भागात कंपनीच्या फिरत्या वाहनाद्वारे ग्रस्त घातली जाणार
असल्याचेही क्रॉम्प्टनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर रोहित्रांमधील तार, ऑइलच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...