आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओजस्विनी’ देणार विचारपूर्वक निर्णयाचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालय - ओजस्विनी महाविद्यालय

नाटकाचे नाव- कालभग्न

लेखक - डॉ. हेमंत कुळकर्णी

दिग्दर्शक - गौरव राणे

जुन्या काळातील भग्नावस्थेतील मंदिरातील कहाणी यात दाखविली आहे. या मंदिरात तीन मित्र बसलेले असतात. त्यांच्या प्रत्येकाचा अपेक्षा, आकांक्षा वेगवेगळ्या असून त्यांची इच्छेप्रमाणे, त्यांना हव्या असलेल्या प्रदेशात त्यांना जायचे असते. चार पात्रांचे हे एकूण नाटक आहे. तीन मित्रांपैकी एकास सोन्याचे आकर्षण, दुसरा भोगविलासी स्त्रियांची भूक तर तिसर्‍याला सत्तेचा लोभ असतो. आपल्या इच्छेप्रमाणे घटना घडायला हवी आणि आपले सुख जेथे आहे अशा प्रदेशात, राज्यात, गावात आपण जायला हवे असा विचार ते करतात. मात्र तेथे अचानक नियती नावाची मुलगी येते व त्यांना समजावते की, त्यांची जी इच्छा आहे ती चुकीची आहे मात्र यासाठी त्यांनी प्रय} करायला हवेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही चुकीचे प्रसंगदेखील येणे गरजेचे असते. तिघा मित्रांभोवतीच हे नाटक फिरते. अखेर आपण ज्या गोष्टींमागे पळतो, एकाच गोष्टीच्या सारखे मागे लागतो ते करण्यापेक्षा सगळ्यांचे ऐकून विचारपूर्वक ती गोष्ट करायला हवी असा संदेश यातून देण्यात आला आहे.

पुरुषोत्तम करंडकची तयारी अंतिम टप्यात
परिवर्तन संस्था आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे आहे. 2 ते 5 ऑक्टोबरपासून जेडीसीसी सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत या स्पर्धा चालतील. एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने चित्रप्रदर्शन होणार असून या वर्षी या प्रकारातील इस्टॉलेशन हे आगळे-वेगळे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. राजू बाविस्कर, विजय जैन, जितेंद्र सुरळकर, शंभू पाटील यांच्या कल्पनेतून हे इस्टॉलेशन सादर केले जाणार आहे. स्पर्धेत 31 एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेसाठी अपर्णा भट, संगीता म्हसकर, वंदना मुळे, रजिता राजेशिर्के, उषा शर्मा, कुमुद नारखेडे, मंजूषा भिडे, नेहा महाजन, विशाल कुळकर्णी, प्रय}शील असून नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे अध्यक्ष शंभू पाटील यांनी कळवले आहे.