आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या नवनियुक्त अायुक्तांसमाेर शहरातील जुनीच अाव्हाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगरपालिकांचे मुख्याधिकारी पदापासून ते महापालिकेच्या अायुक्तपदापर्यंतचा अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेल्या मनपाच्या नवनियुक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांच्यासमाेर शहरातील जुनी अाव्हाने कायम अाहेत. अाधी अभ्यास करणार नंतर दिशा ठरवण्याच्या भूमिकेत असलेल्या अायुक्तांना याेजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाेबतच ठप्प पडलेल्या विकास कामांचाही शुभारंभ करावा लागणार अाहे. यासाठी पालिकेतील अंतर्गत राजकारणासाेबत अातापर्यंत प्रभावी ठरलेल्या बाह्यशक्तीचाही सामना करावा लागणार, हे निश्चित अाहे.
विदर्भापासून प्रशासकीय सेवेला सुरुवात केलेल्या अायुक्त किशाेर बाेर्डे यांना नगरपालिकेतील कारभाराचा अनुभव अाहे. मावळते अायुक्त संजय कापडणीस हे ग्रामीण विकास विभागाकडून नगरविकास विभागाकडे अाले हाेते. त्यामुळे शहराचा अभ्यास करायलाच त्यांना बराचसा कालावधी गेला. त्यात त्यांच्यावर सुरुवातीपासून राजकीय प्रभाव असल्याची चर्चा हाेती अाणि ती महापालिकेच्या सभांमधून वारंवार एेकायलाही मिळाली. त्यामुळे पालिकेत सत्ता जरी खान्देश विकास अाघाडीची असली, तरी बाह्यशक्तीच्या प्रभावामुळे त्यांचा मार्ग खडतर मानला गेला. परंतु, अायुक्त बाेर्डे यांना असलेल्या महापालिकेचा अनुभव शहराच्या कामी येऊन गेल्या काही वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
समस्यांचाडाेंगर : जळगावशहरात दाेन दिवसांअाड पाणीपुरवठा हाेताे. त्यात अाता अमृत याेजनेत समावेश झाल्यामुळे जलवितरण व्यवस्था नव्याने हाेणार अाहे. शहराच्या ४६० किलाेमीटर रस्त्यांवर नव्याने पाइपलाइन टाकली जाणार असून ही भविष्यासाठी चांगले संकेत अाहेत. याेजना केंद्राची असून निधीही शासनाचा असल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे अाहे. त्यासाेबतच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या शहराला जाता जाता कापडणीस यांनी माेकळे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे कापडणीस शहरासाठी काही करून गेले, ही त्यांची अाेळख झाली अाहे. ही माेहीम भविष्यातही राबवून त्यात सातत्य ठेवण्याचे अाव्हान अाहे. कारण हाॅकर्स अाणि पालिका हे विळ्याभाेपळ्याचे नाते झाले अाहे. यातून मध्यस्ताच्या भूमिकेतून अायुक्त बाेर्डेंना मार्ग काढावा लागणार अाहे.
महापालिकेवर अाजमितीस एकूण सुमारे ५५० ते ६०० काेटींचे कर्ज अाहे. त्यात हुडकाेची कर्जफेड ही माेठी समस्या अाहे. डीअारटीच्या डिक्री अाॅर्डरमुळे ३४१ काेटी भरणे पालिकेसमाेर अाव्हान अाहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी एकरकमी परतफेडीच्या मार्गावर गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला प्रवास यशाकडे वाटचाल करीत अाहे. १३ काेटी ५८ लाखांच्या प्रस्तावानंतर अायुक्तांना वेळाेवेळी सभागृहाचा विश्वास जिंकून मार्गक्रमण करायचे अाहे. कारण अाज प्रत्येक जळगावकराच्या डाेक्यावर १५ हजारांपेक्षा जास्त कर्ज मानले जाते. ही कर्जफेड झाल्यास ताे क्षण अभूतपूर्व राहणार हे निश्चित अाहे.
गेल्या तीन वर्षांत सत्ताधारी खाविअा अाणि प्रशासन असा सामना रंगला हाेता. कालांतराने संपूर्ण सभागृह अाणि प्रशासन, असे चित्र तयार झाले अाहे. नगरसेवकांची कामे हाेत नसल्याने त्यांना नागरिकांना ताेंड द्यायचे अाहे. प्रशासन काहीही हातपाय हलवत नसल्याने अार्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यामुळे तिजाेरीत कायम ठणठणाट असताे. अशा परिस्थितीत सत्ताधारी विराेधकांच्या भावनांचा अभ्यास करून त्यांचीही काेंडी करता समन्वयाने काम करण्यासाठी अायुक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार अाहे. ही परिस्थिती महापालिकेंतर्गतची असली तरी पालिकेबाहेरील राजकीय प्रभावालाही ताेंड द्यावे लागणार अाहे. असे करताना अायुक्तांना खरे खाेटे तसेच चांगले वाईटाचाही न्याय द्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...