आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीर्ण शासकीय वाहनांना आले चक्क कचराकुंड्यांचे स्वरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातीलप्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या जीर्ण शासकीय वाहनांना आता कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगारातील या वाहनांचे सुटे भाग चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

पालिका, महसूल, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची जीर्ण वाहने संबंधित कार्यालयांच्या आवारात लावण्यात आली आहेत. तसेच प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात लावलेल्या एका शासकीय जीर्ण जीपमध्ये थेट कचरा साठवला जात आहे. यासह पालिकेच्या जलशुद्धीकरण विभागातील अनेक वाहनांचे स्पेअर पार्टही गायब झाले आहे. याबाबत मात्र शासकीय यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याने, ही संपत्ती आता पूर्णपणे भंगारात जाण्याची शक्यता आहे. किरकोळ दुरुस्ती करून ही वाहने पुन्हा वापरात आणली जाऊ शकतात. मात्र, विशिष्ट कालावधीनंतर वाहने वापरण्याचा नियम असल्याने ही वाहने कार्यालयांच्या आवारात वापराविना उभी आहेत. शासकीय यंत्रणेकडून अशा वाहनांचा लिलाव करून भंगारात विक्री करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, लिलाव प्रक्रिया रखडल्याने या वाहनांचा वापर आता थेट कचराकुंड्यांसारखा केला जात आहे. त्यामुळे शहरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील विविध शासकीय विभागांच्या कार्यालयांमध्ये जीर्णावस्थेतील वाहने पडून आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या तिजोरीत भर घालता येऊ शकते.

स्वच्छ भारत संकल्पनेला छेद
प्रांतकार्यालयासमोरील वाहन आता वापर नसल्याने गंजले आहे. यामुळे यात थेट कचरा साठवला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय कार्यालय स्वच्छ असावेत, अशी संकल्पना मांडली. शहरात मात्र शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच अस्वच्छता सुरू होते. या परिस्थितीत बदल होणे अपेक्षित आहे. पीयूषसोळंके, रहिवासी, गंगाराम प्लॉट, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...