आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात रुग्णांच्या जीवाशी खेळ; जुन्या किमतीत औषध विक्रीवर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घटवण्याचा शासनाचा निर्णय भुसावळातील रुग्णांना ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ या म्हणीचा प्रत्यय देणारा ठरत आहे. औषधांच्या किमती घटल्याने निश्चितच दिलासा मिळू शकतो. मात्र, सुधारित दराची ही औषधी बाजारात अजूनही उपलब्ध नाही. हृदयरोगासह बाळंतपणासाठी आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे.

‘ड्रग्ज प्राइज कंट्रोल’ अंतर्गत आरोग्य विभागाने 11 ऑगस्टपासून 353 जीवनावश्यक औषधांच्या किमती 5 ते 20 टक्क्य़ांनी कमी केलेल्या आहेत. या मुळे जुन्या किमतीची औषधी विक्री बंद करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी औषधी विक्रेत्यांनी जुन्या किमतीचा उल्लेख असलेला औषधीसाठा कारवाईच्या भीतीने होलसेलरकडे जमा केला. या मुळे जीवनावश्यक औषधांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. जुन्या किमतीचा औषधीसाठा जमा करण्यापूर्वी सुधारित दराची औषधी उपलब्ध न झाल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. या मुळे रुग्णांना कोणती औषधी लिहून द्यावी, असा प्रश्न खुद्द डॉक्टरांना सतावत आहे.

ही आहे महत्त्वाची औषधी
जुन्या दरात विक्रीवर बंदी घातलेल्या विविध कंपन्यांच्या 353 औषधांमध्ये हृदयविकारावरील युरोकायनेझ इंजेक्शन, पोटाचे विकार, श्वान दंशावरील रॅबीपूर, सर्पदंश, रक्तदाब, मधुमेह, बाळंतपणावेळी अत्यावश्यक असलेले अँटी-डी इंजेक्शनचा समावेश आहे.

‘ड्रग्ज प्राइज कंट्रोल’ची अंमलबजावणी झाली सुरू
किमतींमध्ये किंचित फरक
आरोग्य विभागाने 353 वेगवेगळ्या औषधांच्या किमती कमी करून त्यांचे सुधारित दर जाहीर केले आहेत. मात्र, झालेल्या बदलात किचिंत फरक आहे. केवळ दोन ते तीन रूपयांनी औषधी स्वस्त झाल्या. श्वानदंशावरील पूर्वीच्या इंजेक्शनची किंमत मात्र 57 रूपयांनी कमी झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने अँडव्हान्स औषधांचा ‘ड्रग्ज प्राइज कंट्रोल’मध्ये समावेश न करता जुन्याच औषधांचा समावेश केला. मात्र, ही औषधीसुद्धा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या अडचणी सुटण्याऐवजी वाढलेल्या आहेत.

मधुमेहींना दिलासा
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले पायोग्लेटोझन, कॉम्बिनेशनचे औषध विक्री करण्यावर शासनाने बंधने घातली होती. मात्र, या औषधांची विक्री करण्याची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. या मुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

औषधी बदलावी लागते
हृदयविकारावरील युरोकायनेझ इंजेक्शन सध्या मिळतच नाही. शिवाय पायोग्लोटोझेनचा तुटवडा जाणवत आहे. या मुळे वारंवार औषधी बदलून द्यावी लागते. औषधी मिळत नसल्याने रुग्णांप्रमाणे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
-डॉ.दीपक जावळे, एम.डी मेडिसीन, भुसावळ

वेळ अत्यंत महत्त्वाची
हृदयविकारावरील इंजेक्शनच्या किमती कमी झालेल्या आहेत. मात्र, ही औषधी वेळेवर न दिल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. यासाठी सुधारित किमतीची औषधे मेडिकल स्टोअर्सवर लवकर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
-डॉ.राजेश मानवतकर, हृदयरोगतज्ज्ञ, भुसावळ

परवानगी आवश्यक होती
सुधारित किमतीचा औषधीसाठा बाजारात येत नाही, तोपर्यंत जुन्या किमतीची औषधी विक्रीला परवानगी देणे आवश्यक होते. या मुळे रूग्णांची होणारी भटकंती थांबेल. वेळेवर उपचार सोयीचे होतील.
-राजेश काबरा, अध्यक्ष, शहर केमिस्ट असोसिएशन, भुसावळ

अँटी-डी गरजेचे
निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या महिलेस बाळंतपणानंतर ए दिवसाच्या आत अँटी-डी इंजेक्शन देणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा महिलेसोबतच तिच्या येणार्‍या बाळाला धोका होऊ शकतो.
-डॉ.प्रदीप नाईक, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ