आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Syllabus Of Engineering Applicable For Any Five

अभियांत्रिकीच्या जुन्या अभ्यासक्रमास ‘एनी फाईव्ह’ लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अभियांत्रिकीतील 80/20 पॅटर्नच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनी फाईव्ह’ची अट शुक्रवारी विद्यापीठाने मान्य केली. त्यानुसार पहिल्या आणि दुस-या वर्षाचे तसेच दुस-या आणि तिस-या वर्षात मिळून पाच विषय नापास असणा-या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्षात प्रवेश मिळेल.

युवा सेनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.ए.यू.बोरसे तसेच बीसीयुडी संचालक डॉ.दिलीप हुंडीवाले यांच्याशी चर्चा करीत ‘एनी फाईव्ह’ची अट मान्य करण्याची मागणी केली.

चर्चेअंती डॉ.मेश्राम यांनी जुन्या अभ्यासक्रमासाठी ही सूट मान्य केली. मात्र, सीजीपीए पद्धतीत ‘एनी फाईव्ह’ची सूट मिळणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यंदापासून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात ‘सीजीपीए’ पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांनाच या सवलतीचा लाभ मिळेल. ‘सीजीपीए’ पॅटर्ननुसार परीक्षा देणा- या विद्यार्थ्यांना ‘एनी थ्री’ची सूट मिळेल. ‘एनी फाईव्ह’ची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी आधीच्या वर्षाचे सर्व विषय पास (ऑल क्लियर) असणे आवश्यक आहे.